'खास' लोकांची कामे करण्यासाठी मोदींनी दिली मंत्र्यांना बढती : कॉंग्रेसची टीका

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्रिमंडळाचा विस्तार केला खरा. मात्र, या विस्तारावरून विरोधकांच्या तीव्र टीकेचा सामना मोदींना करावा लागत आहे. मोदींचा मंत्रिमंडळ विस्तार म्हणजे 'जेष्ठ नागरिकांचा क्लब', अशा शब्दांत कॉंग्रेस नेते मनिष तिवारी यांनी टीका केली आहे.

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Sep 3, 2017, 08:50 PM IST
'खास' लोकांची कामे करण्यासाठी मोदींनी दिली मंत्र्यांना बढती : कॉंग्रेसची टीका title=

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्रिमंडळाचा विस्तार केला खरा. मात्र, या विस्तारावरून विरोधकांच्या तीव्र टीकेचा सामना मोदींना करावा लागत आहे. मोदींचा मंत्रिमंडळ विस्तार म्हणजे 'जेष्ठ नागरिकांचा क्लब', अशा शब्दांत कॉंग्रेस नेते मनिष तिवारी यांनी टीका केली आहे.

मोदी मंत्रिमंडळात ९ नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली. मात्र, यातील बहुतांश मंत्री हे ६० ओलांडलेले आहेत याकडे तिवारी यांनी लक्ष वेधले. तसेच, राजीवप्रताप रूडी, बंडारू दत्तात्रेय, कलराज मिश्रा या आणि इतर मंत्र्यांचे राजीनामे घेऊन, मागील तीन वर्षांच्या काळात आपण कसे सपाटून आपटलो, हेच पंतप्रधान मोदी यांनी मान्य केले आहे, असेही तिवारी यांनी म्हटले आहे.

केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर विरोधी पक्ष  कॉंग्रेसने एक पत्रकार परिषद घेतली. या वेळी तिवारी बोलत होते. या वेळी बोलताना 'खास' लोकांची कामे करण्यासाठी मोदींनी मंत्र्यांना बढती दिली, असा घणाघातही तिवारी यांनी केला.