अरविंद केजरीवाल यांची कार चोरीला

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची वॅगनार कार चोरीच्या झाल्याची माहिती समोर येतीये. केजरीवाल यांची ही कार गुरूवारी सचिवालयाच्या जवळून चोरीला गेलीये.

Updated: Oct 12, 2017, 06:52 PM IST
अरविंद केजरीवाल यांची कार चोरीला title=

नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची वॅगनार कार चोरीच्या झाल्याची माहिती समोर येतीये. केजरीवाल यांची ही कार गुरूवारी सचिवालयाच्या जवळून चोरीला गेलीये.

दररोज देशभरात अनेक गाड्या चोरीला जातात, पण एखाद्या मुख्यमंत्र्यांची कार चोरीला गेल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. 

कार चोरी गेल्याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी याचा तपास सुरू केलाय. आता स्वत: मुख्यमंत्र्यांची कार चोरीला गेल्याने दिल्लीती कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न उपस्थित झाला आहे.