डोकलाममध्ये पुन्हा चीनच्या कुरापती

भारत-चीन सीमेवर पुन्हा अस्वस्थता निर्माण झाली आहे. 

Updated: Mar 6, 2018, 05:12 PM IST
डोकलाममध्ये पुन्हा चीनच्या कुरापती  title=

नवी दिल्ली : भारत-चीन सीमेवर पुन्हा अस्वस्थता निर्माण झाली आहे. डोकलाममध्ये चीनच्या कुरापती सुरूच आहेत. चीन डोकलाममध्ये हेलिपॅड आणि चौक्या उभारतंय. संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण यांनी लोकसभेत ही माहिती दिलीय.

भारत-चीन सीमेवर संवेदनशील परिस्थिती निर्माण झाल्याची माहिती याआधीच संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी दिली होती. दरम्यान चीनमध्ये नुकताच अर्थसंकल्प सादर झाला. त्यामध्ये चीननं संरक्षण निधीमध्ये मोठी वाढ केलीय.

गेल्या वर्षी चीननं संरक्षण क्षेत्रासाठी दीडशे अरब डॉलर्सची तरतूद केली होती. यावर्षी ते वाढवून 175 अरब डॉलर एवढी तरतूद करण्यात आलीय. अमेरिकेनंतर संरक्षण क्षेत्रासाठी सर्वाधिक तरतूद करणारा चीन हा दुसरा देश आहे.