चीनचा कृत्रिम पाऊस, भारतात दुष्काळाचं सावट

चीनच्या उत्तरेतल्या असणार दुष्काळी प्रदेशात कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी चीनंनं नवा प्रयोग सुरू केला आहे.

Jaywant Patil Updated: Mar 30, 2018, 07:15 PM IST
चीनचा कृत्रिम पाऊस, भारतात दुष्काळाचं सावट title=

बीजिंग : चीनमध्ये नुकत्याच करण्यात आलेल्या एका संशोधनानं भारतात पुराचा धोका निर्माण झालं आहे. चीनच्या उत्तरेतल्या असणार दुष्काळी प्रदेशात कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी चीनंनं नवा प्रयोग सुरू केला आहे. मान्सूनच्या पावसाचे ढग एका विशिष्ठ वातावरणात अडकवून त्यांच्यापासून पाऊस पाडण्याच्या चीनचा प्रयत्न आहे. प्रयोग यशस्वी झाला तर उत्तर चीनमधला दुष्काळ दूर करण्यासाठी दरवर्षी लागणारा १० अब्ज क्युबिक मीटर पडणार आहे. सध्या हिमालयाच्या तिबेटमध्ये हा प्रयोग सुरू आहे.  पण याचा दुष्परिणाम चीनमधून भारतात वाहत येणाऱ्या ब्रम्हपुत्रा नदीला मोठा पुराचा धोका निर्माण होणार आहे. 

सात राज्यात दुष्काळ पडण्याची शक्यता

चीननं पाणी अडवलं तर हा धोका काहीसा कमी होईल..पण मान्सूनचे ढग तिबेटमध्येच पाऊस देऊन गेले तर भारताच्या ईशान्येच्या सात राज्यात दुष्काळ पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे चीनच्या या जगावेगळ्या प्रयोगानं भारताची मोठी कोंडी होण्याची भीती व्यक्त होत आहे.