आताची सर्वात मोठी बातमी| सोनिया गांधी यांची तब्येत बिघडली

सोनिया गांधी यांची प्रकृती बिघडली, तातडीनं रुग्णालयात दाखल 

Updated: Jun 12, 2022, 02:35 PM IST
आताची सर्वात मोठी बातमी| सोनिया गांधी यांची तब्येत बिघडली title=

मुंबई : राजकारणातील आताची सर्वात मोठी बातमी आहे. काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांची तब्येत बिघडल्याची माहिती मिळाली आहे. त्यांना दिल्लीमधल्या गंगाराम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. 

सोनिया गांधी यांची प्रकृती दुसऱ्यांदा बिघडल्याची माहिती मिळाली आहे. याआधी त्यांना कोरोना झाला होता. त्यामुळे त्यांची तब्येत बिघडली होती. आता प्रकृती अस्वस्थ असल्याने त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. 

सोनिया गांधी यांची प्रकृती सध्या स्थिर असून डॉक्टरांची टीम त्यांच्यावर उपचार करत आहे. काही दिवसांपूर्वी त्यांची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली होती. 

राहुल गांधी यांना ईडीकडून समन्स बजावण्यात आलं आहे. त्यांना उद्या हजर व्हायचं आहे. त्याआधी सोनिया गांधी यांची प्रकृती बिघडल्याची माहिती मिळाली आहे. तर सोनिया गांधींना २३ जूनला हजर राहण्यासाठी समन्स बजावण्यात आलं आहे.