काँग्रेसची ७६ उमेदवारांची यादी जाहीर, मात्र...

गुजरात विधानसभा निवडणूकीसाठी काँग्रेसनं काल रात्री उशिरा 76 उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली. आज दुसऱ्या टप्प्याच्या मतदानासाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्यानं रात्री उशिरा काँग्रेसनं उमेदवारांची घोषणा केली. 

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Nov 27, 2017, 11:29 AM IST
 काँग्रेसची ७६ उमेदवारांची यादी जाहीर, मात्र... title=

अहमदाबाद : गुजरात विधानसभा निवडणूकीसाठी काँग्रेसनं काल रात्री उशिरा 76 उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली. आज दुसऱ्या टप्प्याच्या मतदानासाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्यानं रात्री उशिरा काँग्रेसनं उमेदवारांची घोषणा केली. 

पहिल्या यादीत 86 उमेदवार घोषित 

याआधी पक्षानं पहिल्या यादीत 86 उमेदवार घोषित केले आहेत. दोन्ही टप्प्यांच्या मतदानाचा विचार करता काँग्रेसनं अद्यापही 20 जागांवर उमेदवार निश्चित केलेले नाहीत. 

अद्यापही 20 जागांवर उमेदवार निवडणे बाकी

आज अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. दुपारी तीन पर्यंत उरलेल्या जागांवर तिकीटं कुणाला मिळतात याकडे सर्वांचं लक्ष आहे. दुसऱ्या यादीत 3 अनुसुचित जातीचे तर 11 अनुसिचीत जमातीचे उमेदवार आहेत. गुजरात विधानसभेच्या 182 जागांसाठी 9 डिसेंबरला पहिल्या तर 14 डिसेंबरला दुसऱ्या टप्प्याचं मतदान होईल.