कोरोना चाचणी : सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारकडे अहवाल मागितला

देशात कोरोनाच्या संकटाचे ढग गडद होत चालले आहे. कोरोनाचा वाढता फैलाव यामुळे अनेक जण चिंतेत पडले आहेत. 

Updated: Apr 4, 2020, 09:28 AM IST
कोरोना चाचणी : सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारकडे अहवाल मागितला title=
संग्रहित छाया

नवी दिल्ली : देशात कोरोनाच्या संकटाचे ढग गडद होत चालले आहे. कोरोनाचा वाढता फैलाव यामुळे अनेक जण चिंतेत पडले आहेत. त्यातच कोरोनाची चाचणी ही ठरावीक रुग्णालय आणि शासकीय रुग्णालयात होत आहे. त्यामुळे कोरोनाची चाचणी करण्यासाठी खासगी लॅबमध्ये ४५०० रुपये मोजावे लागत आहेत. त्यामुळे सामान्यांना ही चाचणी करुन घेणे अवघड आहे. त्यामुळे ही महागडी कोरोना चाचणी मोफत करण्याची मागणी होऊ लागली आहे. दरम्यान, कोरोना चाचणी मोफत करण्याबाबत एक याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. त्यानंतर न्यायालयाने केंद्र सरकारकडे अहवालाची मागणी केली आहे.

खासगी लॅब्सना कोरोना चाचणी करण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिक दाखल करण्यात आलीय. या चाचणीसाठी साडे चार हजारांचा खर्च येतो. सध्या लॉकडाऊनमुळे सर्वसामान्यांवर याचा आर्थिक भार पडू शकतो. त्यामुळे ही चाचणी मोफत कऱण्यात यावी अशी मागणी करण्यात आलीय. यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारकडे अहवाल मागितला आहे. 

कोरोनाची टेस्ट करण्यासाठी लागणारा  ४५०० रुपयांचा खर्च हा खासगी लॅबमध्ये महागडा आहे, त्यामुळे सर्वसामान्य जनतेला हे परवडणार नाही. ही कोरोनाची चाचणी मोफत करावी, अशी याचिका सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल केली होती, त्यावर सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारकडे अहवाल मागितला आहे. दरम्यान, याचिकेवरील पुढील सुनावणी ही पुढील आठवड्यात होणार आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे लक्ष लागले आहे.