Covid-19 : पिझ्झा डिलिव्हरी बॉयच्या संपर्कात आलेल्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह

ऑनलाइन फूड ऑर्डर करणं सुरक्षित आहे का?   

Updated: Apr 20, 2020, 05:45 PM IST
Covid-19 : पिझ्झा डिलिव्हरी बॉयच्या संपर्कात आलेल्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह title=

मुंबई : दिल्लीच्या दक्षिण भागात एका पिझ्झा डिलिव्हरी बॉयला कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती. या घटनेनंतर तब्बल ७० ग्राहकांना क्वारंटाइन करण्यात आलं आहे. परंतु आता याप्रकरणी एक दिलासादायक बातमी समोर येत आहे. यातील अतिजोखीम असलेल्या १६ गणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. वृत्तसंस्था एएनआयनं बातमीला दुजोरा दिला आहे. 

दक्षिण दिल्लीतील डिस्ट्रिक मजिस्ट्रेट बीएम मिश्रा एका पिझ्झा डिलिव्हरी बॉयला कोरोनाची लागण झाल्याचं सांगितले होते. पिझ्झा डिलिव्हरी बॉय मार्चच्या अखेरीपर्यंत कामावर रूजू होता. पण दरम्यानच्या काळात ही व्यक्ती डायलिसिस करता हॉस्पिटलला गेला होता. यावेळीच त्याला कोरोनाची लागण झाल्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. 

कोरोनाव्हायरसमुळे सगळीकडे लॉकडाऊन करण्यात आलं आहे. अशावेळी अन्न-धान्य आणि खाण्याच्या ऑनलाइन ऑर्डरवर कोणतेही नियम लागू नाहीत. कुठेही ऑनलाइन फूड ऑर्डरची डिलिव्हरी केली जात आहे. कुणालाही घराबाहेर पडण्यास परवानगी नाही मात्र ऑनलाइन फूड ऑर्डर केल्यावर ते घरपोच दिलं जाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.