नदीत बुडालेला ट्रक बाहेर काढताना घडला असा अपघात, व्हिडीओ पाहून तुम्हालाही बसेल धक्का....

एक ट्रक नदीत बुडाला आहे. ज्याला काढण्यासाठी एक क्रेन बोलवला गेला. परंतु या ट्रकला बाहेर काढताना अशी काहीतरी घटना घडते जी तुम्ही श्वास रोखून पाहाल.

Updated: Aug 7, 2022, 04:56 PM IST
नदीत बुडालेला ट्रक बाहेर काढताना घडला असा अपघात, व्हिडीओ पाहून तुम्हालाही बसेल धक्का.... title=

मुंबई : सोशल मीडियावर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडीओ पाहायला मिळतात. यामध्ये प्रत्येकाच्या आवडीचा कन्टेन देखील पाहायला मिळतो. त्यात आपल्या अशा काही अपघाताचे व्हिडीओ देखील पाहायला मिळतात जे आपल्याला थक्कं करतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, तो पाहिल्यानंतर तुमचा देखील थरकाप उडेल.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक ट्रक नदीत बुडाला आहे. ज्याला काढण्यासाठी एक क्रेन बोलवला गेला. परंतु या ट्रकला बाहेर काढताना असं काहीतरी घटना घडते जी, तुम्ही श्वास रोखून पाहाल.

या व्हिडीओमध्ये हे दिसत आहे की, क्रेन ट्रकला अर्धा उचलते, परंतु तेवढ्यात क्रेनचा तोल जातो आणि ट्रक सोबत क्रेन देखील खाली पाण्यात पडतो. एवढेच काय तर या क्रेनचा ड्रायव्हर देखील त्याच्यासोबत पाण्यात पडतो.

परंतु या ड्रायव्हरचं नशीब इतकं चांगलं असतं की, त्याला गंभीर दुखापत होत नाही आणि तो या अपघातातून बाहेर सुखरुप वाचतो. तुम्ही व्हिडीओमध्ये पुढे पाहू शकता की, क्रेनचा ड्रायव्हर पोहत बाहेर पडतो.

हा व्हिडीओ essence world या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म यूट्यूबवर शेअर करण्यात आला आहे, ज्याला आतापर्यंत 57 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

अनेक लोकांनी व्हिडीओ पाहिल्यानंतर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. हा अपघात ओडिशातील तालचेर शहरातील असल्याचे सांगण्यात येत आहे.