प्रियकराने कोर्टात सांगितले - अनेकवेळा प्रेयसीच्या संमतीने ठेवले संबंध, आरोपीला तुरुंगवास

Boyfriend Girlfriend Relationship : महाविद्यालयात जाण्यासाठी ती निघाली. मात्र, तिच्या मित्राने कॉलेजला सोडण्याच्या बहाण्याने एका टेकडीवरील मंदिरात नेले आणि पुढे जे झाले ते त्याच्या चांगलेच अंगलट आले.  

Updated: Aug 12, 2022, 10:00 AM IST
प्रियकराने कोर्टात सांगितले - अनेकवेळा प्रेयसीच्या संमतीने ठेवले संबंध, आरोपीला तुरुंगवास title=

मुंबई : Boyfriend Girlfriend Relationship : महाविद्यालयात जाण्यासाठी ती निघाली. मात्र, तिच्या मित्राने कॉलेजला सोडण्याच्या बहाण्याने एका टेकडीवरील मंदिरात नेले आणि पुढे जे झाले ते त्याच्या चांगलेच अंगलट आले. दोघेही मित्र एकमेकांचे मित्र होते. याबाबत प्रियकराने न्यायालयात सांगितले की,अनेकवेळा प्रेयसीच्या संमतीने संबंध ठेवले. न्यायालयाने बॉयफ्रेंडचे म्हणणे ऐकूनही तिच्या मित्राला अर्थात आरोपीला न्यायालयाने तुरुंगवास ठोठावला.

जयपूर येथील पॉक्सो प्रकरणातील विशेष न्यायालयाने, क्रमांक-2 ने मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपी जयकिशन मीना याला वीस वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. तसेच न्यायालयाने आरोपीला एक लाख वीस हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे.

फिर्यादीच्यावतीने न्यायालयाला सांगण्यात आले की, 14 सप्टेंबर 2019 रोजी पीडित मुलगी कॉलेजला जाण्यासाठी घरातून बाहेर पडली होती. वाटेत आरोपीने तिला कॉलेज सोडण्याच्या बहाण्याने आपल्या कारमध्ये बसवले. आरोपीने तिला कॉलेजमध्ये नेण्याऐवजी पीडितेला एका टेकडीवर बांधलेल्या मंदिरात नेले.येथे आरोपीने पीडितेवर पार्किंगमध्ये अत्याचार केला. यादरम्यान पीडितेचा आवाज ऐकून लोक जमा झाले. त्याचवेळी पीडितेच्या वडिलांच्या तक्रारीवरून हरमदा पोलीस स्टेशनने 17 सप्टेंबर रोजी आरोपीला अटक केली. त्यानंतर हे प्रकरण न्यायालयात गेले.

दुसरीकडे, पीडितेसोबत त्याचे प्रेमसंबंध होते, असे आरोपीच्यावतीने सांगण्यात आले. याशिवाय घटनेच्या दिवशी त्याने अत्याचार केलेला नाही. मात्र, त्याआधी सहा वेळांपेक्षा अधिक वेळा दोघांमध्ये संमतीने संबंध आहेत. त्याचवेळी, पैशाच्या व्यवहारावरुन झालेल्या वादामुळे त्याच्यावर एफआयआर दाखल करण्यात आला आहे. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने आरोपीला शिक्षा सुनावली.