सासऱ्याचा मोठ्या सुनेवर जडला जीव; मुलगा ठरायचा दोघांच्यात अडथळा, छोट्या सुनेने उलगडली हत्येची कहाणी

Crime Story: घरातील धाकट्या सुन या साऱ्याची साक्षीदार ठरते म्हणून पोलिसांना ही गुंतागुंत लगेच सोडविता येते.

Pravin Dabholkar | Updated: Jun 25, 2023, 02:01 PM IST
सासऱ्याचा मोठ्या सुनेवर जडला जीव; मुलगा ठरायचा दोघांच्यात अडथळा, छोट्या सुनेने उलगडली हत्येची कहाणी title=

Crime Story: सासरे आणि सून यांचे नाते हे मुलगी आणि वडिलांप्रमाणेच असते. हे नाते खूप निर्मळ, निस्वार्थी मानले जाते. पण या नात्याला काळीमा फासेल अशी एक बाब समोर आली आहे. ठरकी सासरा आपल्या मोठ्या मुलाच्या बायकोच्या प्रेमात पडतो. स्वत:च्या मुलालाच आपल्या प्रेमातील अडथळा मानायला लागतो. आणि त्याचे आयुष्य संपविण्याचा घाट घालण्यापर्यंत त्याची मजल जाते. घरातील धाकट्या सुन या साऱ्याची साक्षीदार ठरते म्हणून पोलिसांना ही गुंतागुंत लगेच सोडविता येते.

सासरे आणि सून यांचे नाते हे बाप-लेकीसारखे असते, असे म्हणतात. मात्र बिहारमधील सुपौल येथे अनैतिक संबंधांचे एक प्रकरण समोर आले आहे. ज्याने या पुण्यवान नात्याला बाधा पोहोचेल असा प्रकार घडला आहे.

या सत्य घटनेत सासरे आणि सून एकमेकांवर प्रेम करू लागले होते. दोघांमध्ये अनैतिक संबंध निर्माण झाले. आश्‍चर्याची गोष्ट म्हणजे सुनेच्या प्रेमात सासरा इतका वेडा झाला की त्याने आपल्याच मुलाची हत्या केली.

मुलाची हत्या करुन वडिलांनी पोलिस ठाणे गाठले

ही धक्कादायक घटना सुपौल जिल्ह्यातील सरायगढ पोलीस ठाण्याच्या भाप्तियाही गावातून समोर आली आहे. जिथे हरिनारायण यादव नावाच्या व्यक्तीचे त्याच्या सुनेसोबत अनैतिक संबंध होते. दोघांना एकत्र राहायचे होते, असे सांगितले जाते. मात्र आरोपीचा मुलगा किशन यादव हा त्यांच्या अवैध संबंधात अडथळा ठरत होता.

त्यामुळे दोघांनी मिळून त्याला मार्गावरून दूर करण्याचा कट रचला आणि वडिलांनी मुलाच्या डोक्यात हातोड्याने वार करून त्याचा खून केला. आश्‍चर्याची बाब म्हणजे, हत्येनंतर आरोपी पोलिसात तक्रार देण्यासाठीही पोहोचला. तेथे जाऊन त्यांनी आपल्या मुलाचा रस्ता अपघातात मृत्यू झाल्याचे सांगितले.

धाकट्या सुनेने दोघांबद्दल केला खुलासा 

तपास करत असताना पोलिसांनी गावात पोहोचून मृताचा लहान भाऊ आणि त्याची पत्नी कविता देवी यांची चौकशी केली. अल्पवयीन सून कविताने सासरे आणि मेहुणी यांच्यातील अवैध संबंध पोलिसांसमोर उघड केले.

महिलेने सांगितले की, तिच्या जाऊबाईचे सासरे हरी नारायण यादवसोबत अनैतिक संबंध होते. ही बाब मोठा दीर किशनला समजताच दोघेही त्याच्याशी रोज भांडू लागले. एवढेच नव्हे तर सासरच्यांनी मुलाला घरीही येऊ दिले नाही.

सासरे आणि सून यांच्या अनैतिक संबंधांवर बसली पंचायत 

सासरा आणि सून यांच्यातील अनैतिक संबंधाची माहिती संपूर्ण गावाला लागल्याचे सांगण्यात येते. एकदा गावच्या सरपंचाने प्रकरण मिटवण्यासाठी पंचायतही बोलावली होती.

गावातील लोकांसमोर सासरे आणि सून या दोघांनी वेगळे राहण्याचे मान्य केले होते. मात्र पंचायत झाल्यानंतर पुन्हा दोघांमध्ये अनैतिक संबंध निर्माण झाले. मुलाने विरोध केला असता सासरच्यांनी कृष्णा यादवचा हातोड्याने खून केला.