'पेट्रोल, डिझेलचे दर रोज बदलणे ग्राहकांसाठी फायदेशीर'

 पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज बदलणे सामान्य ग्राहकासाठी फायदेशीर असल्याचे धर्मेद प्रधान यांनी सांगितले.

Pravin.Dabholkar Pravin Dabholkar | Updated: Sep 4, 2017, 05:04 PM IST
'पेट्रोल, डिझेलचे दर रोज बदलणे ग्राहकांसाठी फायदेशीर' title=

नवी दिल्ली : मागील दोन महिन्यांमध्ये पेट्रोलच्या दरात साडेसहा रुपयांची वाढ झाली आहे. पेट्रोल, डिझेलच्या किंमतीत वेळी-अवेळी होणारी दरवाढ ही वाहनचालकांसाठी डोकेदुखी ठरत असते. यासंबंधी पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी महत्त्वाची घोषणा केली. दररोज पेट्रोल आणि डिझेलचे दर बदलणे ग्राहकांच्या हिताचे आहे. त्यामुळे यामध्ये बदल करायची आवश्यकता वाटत नाही.  
यापुढेही पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज बदलत राहणार का, असा प्रश्न प्रधान यांना विचारण्यात आला. यावर बोलताना पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज बदलणे सामान्य ग्राहकासाठी फायदेशीर असल्याचे त्यांनी सांगितले. 

'आंतरराष्ट्रीय बाजारा'चा परीणाम 

'आंतरराष्ट्रीय बाजारातील इंधनाच्या किंमतीचा परीणाम भारतातील इंधन किंमतीवर होत राहतो. पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज बदलत असल्याने आंतरराष्ट्रीय बाजारात इंधनाचे दर कमी झाल्यास त्याचा फायदा लगेच नागरिकांना मिळतो. याशिवाय इंधनाच्या दरांमध्ये वाढ झाल्यास ती एकाएकी न होता हळूहळू लागू होते. त्यामुळे ग्राहकांना अचानक ताण येत नसल्याचे'ही यावेळी धर्मेंद्र प्रधान यांनी सांगितले.