वडिलांच्या संपत्तीत मुलीचा पूर्ण अधिकार - सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय

सर्वोच्च न्यायालयाने  (Sureme Court)  वडिलांच्या मालमत्तेवर मुलींच्या हक्काबाबतमहत्त्वाचा निर्णय दिला आहे.   

Updated: Jan 21, 2022, 03:30 PM IST
वडिलांच्या संपत्तीत मुलीचा पूर्ण अधिकार - सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय title=

नवी दिल्ली | वडिलांच्या मृत्यूनंतर संपत्ती वाटपावरुन भाऊ-बहिणींमध्ये वाद होणं ही काही आता नवी बाब राहिली नाही. या संपत्तीच्या वादावरुन अनेक वेळा कोर्टाची पायरी चढावी लागते.  संपत्तीवरुन रुसवे फुगवे पाहायला मिळतात. सर्वोच्च न्यायालयाने वडिलांच्या मालमत्तेवर मुलींच्या हक्काबाबत महत्त्वाचा निर्णय दिला आहे. वडिलांच्या संपत्तीवर मुलींचा पहिला हक्क असेल, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. (daughters will have equal rights to fathers property supreme courts biggest decision)

न्यायालयाने काय म्हटलंय? 

"संयुक्त कुटुंबात राहणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू मृत्यूपत्र न करता झाला, तर त्याच्या मालमत्तेवर त्याची मुलगी उत्तराधिकारी असेल", असं न्यायलयाने नमूद केलं आहे. "तसेच मुलीला तिच्या वडिलांच्या भावाच्या मुलांपेक्षा मालमत्तेचा वाटा देण्यास प्राधान्य दिलं जाईल. हिंदू उत्तराधिकार कायदा, 1956 लागू होण्यापूर्वी मालमत्ता वितरणालाही अशी व्यवस्था लागू होईल", असंही कोर्टानं स्पष्ट केलंय. 

तामिळनाडूतील एका खटल्याचा निकाल देताना न्यायमूर्ती एस. अब्दुल नजीर आणि कृष्णा मुरारी यांच्या खंडपीठाने हा 51 पानांचा निकाल दिला.