दाऊदची मुंबईतील करोडोंची प्रॉपर्टी जप्त करणार सरकार

दाऊद इब्राहिमची मुंबईमधील करोडोंची मालमत्ता सरकार जप्त करणार

शैलेश मुसळे | Updated: Apr 20, 2018, 02:38 PM IST
दाऊदची मुंबईतील करोडोंची प्रॉपर्टी जप्त करणार सरकार  title=

नवी दिल्ली : सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर मोस्ट वॉन्टेड दहशतवादी दाऊद इब्राहिमची मुंबईमधील स्थित करोडोंची मालमत्ता सरकार जप्त करणार आहे. या प्रकरणात दाऊदची आई अमीना कासकर आणि दाऊदची बहिण हसीना पारकरची याचिका सरकारने फेटाळली आहे. दाऊदची ही प्रॉपर्टी मुंबईतील नागपाडा भागात आहे. दाऊदची बहिण आणि आई यांचा या जागेवर ताबा होता. आता दाऊदची आई आणि बहिणीचा मृत्यू झाला आहे.

1988 मध्ये सरकारने दाऊदची ही प्रॉपर्टी सीज केली होती. स्मगर्लसची प्रॉपर्टी सीज करण्यासाठी कायद्यानुसार ही कारवाई झाली होती. सरकारच्या या निर्णयावर अमीना कासकर आणि हसीना पारकर यांनी कोर्टात याचिका दाखल केली होती. ट्रिब्यूनल कोर्ट आणि दिल्ली हायकोर्टाने ही याचिका फेटाळल्यानंतर दाऊदची बहिण आणि आई यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. आता सुप्रीम कोर्टाने देखील ही याचिका फेटाळली आहे. दाऊद इब्राहिम 1993 मुंबई बॉम्ब स्फोटातील आरोपी आहे. यामध्ये 257 लोकांचा मृत्यू झाला होता. यानंतर दाऊद देश सोडून पळून गेला होता.

2012 मध्ये सुप्रीम कोर्टाने या प्रकरणात स्थगितीचा आदेश दिला होती. सरकारचा दावा होता की, अमीना कासकर आणि हसीना पारकर यांना प्रॉपर्टीचे कागदपत्र दाखवण्यासाठी सांगण्यात आले होते पण ते दाखवण्यात आले नव्हते. दाऊदची आई आणि बहिण यांच्याकडे मुंबईतील 7 महत्त्वाच्या जागेवर प्रॉपर्टी आहे. दाऊदला आता यूनाइटेड नेशन सेक्युरिटी काउंसिलने जागतिक आरोपी म्हणून घोषित केलं आहे. दक्षिण मुंबईमध्ये दाऊदचं एक हॉटेल आहे आणि एक गेस्ट हाऊस देखील आहे. सरकारने याआधीच त्याचा लिलाव केला आहे.