पॅनकार्ड आधारसोबत लिंक करण्यासाठी मुदत वाढवली

पॅनकार्ड आधार कार्डाशी लिंक करण्याची मुदत पुन्हा एकदा वाढवण्यात आली आहे. आज म्हणजे ३१ ऑगस्ट २०१७ ही तारीख या गोष्टी लिंक करण्याची अंतिम तारीख होती. मात्र

Dakshata Thasale दक्षता ठसाळे - घोसाळकर | Updated: Aug 31, 2017, 06:18 PM IST
पॅनकार्ड आधारसोबत लिंक करण्यासाठी मुदत वाढवली  title=

नवी दिल्ली : पॅनकार्ड आधार कार्डाशी लिंक करण्याची मुदत पुन्हा एकदा वाढवण्यात आली आहे. आज म्हणजे ३१ ऑगस्ट २०१७ ही तारीख या गोष्टी लिंक करण्याची अंतिम तारीख होती. मात्र

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार यामध्ये वाढ करण्यात आली आहे. आता ही मुदत ४ महिने वाढवून ३१ डिसेंबर २०१७ ही अंतिम तारीख देण्यात आली आहे. असं सांगण्यात आलं होतं की, आधार कार्ड पॅन नंबरशी लिंक केलं नाही तर इनकम टॅक्स पेअर्स रिटर्न प्रोसेस करता येणार नाही. आता आधार कार्ड फक्त गॅस सबसिडी, बँक खाते उघडणे आणि मोबाईल सिम खरेदी करण्यापूर्तीच उपयोगी राहणार आहे. 

मात्र आता केंद्र सरकारने सरकारी योजनांसाठी आधार कार्ड गरजेची असल्याची डेड लाईन ३१ डिसेंबरपर्यंत वाढवली आहे. तर सुप्रीम कोर्ट या संदर्भातील सुनावणी नोव्हेंबर महिन्यातील पहिल्या आठवड्यात होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. आधारशी संबंधीत अनेक पिटिशन दाखल झाले आहेत. त्यामुळे नोव्हेंबरच्या पहिल्या महिन्यात याची सुनावणी होईल. तोपर्यंत नागरिकांकडे वेळ आहे. त्यांनी आताही आधार कार्ड पॅन कार्डशी लिंक करावा. 

जर तुमचा पॅन क्रमांक आधार कार्डाशी लिंक असेल, तर तुम्हाला नवीन बँक खातं सहज उघडता येईल. तुम्हाला आयटीआर भरतानाही कोणती अडचण येणार नाही. तसेच जर गुंतवणुकीच्या दृष्टीने शेअर बाजाराचा विचार करत असाल तर कुठल्याही म्युच्युअल फंडाचे युनिट खरेदीसाठी आणि डीमॅट अकाऊंट ओपन करणं सोपं जाईल. नवीन डेबिट अथवा क्रेडिट कार्ड घेणंही सोयीचे ठरणार आहे.