मागण्यांवर साखऱ कारखाना महासंघ आक्रमक

त्वरीत तोडगा निघाला नाही तर रस्त्यावर आंदोलनं होतील असा इशारा राष्ट्रीय साखर महासंघाचे अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी दिलाय.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Jan 19, 2018, 01:10 AM IST
मागण्यांवर साखऱ कारखाना महासंघ आक्रमक title=

नवी दिल्ली : राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाच्या शिष्टमंडळाने केंद्र सरकारचे साखर सहसचिव सुभाषित पांडा यांची भेट घेऊन साखर उद्योगासमोरच्या समस्या मांडल्या. 

मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन

देशाबाहेर साखर पाठवण्यासाठी अनुदान द्यावं आणि आयात पूर्णपणे बंद करण्याची मागणी साखर कारखाना महासंघाने केली. त्वरीत तोडगा निघाला नाही तर रस्त्यावर आंदोलनं होतील असा इशारा राष्ट्रीय साखर महासंघाचे अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी दिलाय.