बाबा रामरहिमच्या डेऱ्यात सापडले हे घबाड, १०० बॅंक कर्मचाऱ्यांकडून मोजमाप

हरियाणातील सिरसा येथील गुरमीत बाबा रामरहिमच्या डेरा सच्चा सौदाची झाडाझडती करताना मोठे घबाड हाती आले आले आहे.  

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Sep 9, 2017, 09:05 AM IST
बाबा रामरहिमच्या डेऱ्यात सापडले हे घबाड, १०० बॅंक कर्मचाऱ्यांकडून मोजमाप title=

पंचकुला : हरियाणातील सिरसा येथील गुरमीत बाबा रामरहिमच्या डेरा सच्चा सौदाची झाडाझडती करताना मोठे घबाड हाती आले आले आहे.  दोन खोल्या भरून रोकड जप्त करण्यात आली आहे. रोकड मोजण्यासाठी १०० बॅंक कर्मचारी बोलविण्यात आले आहेत. अजूनही डेऱ्याची झाडाझडती सुरूच असून आणखी मोठे घबाड हाती लागण्याची शक्यता आहे. 

बलात्काराच्या प्रकरणातील आरोपी बाबा रामरहिमने भारतीय चलनालाच आव्हान उभे केले होते. त्याने स्वत:ची टांकसाळ उभी केल्याचे दिसून येत आहे. प्लास्टीक चलन त्याच्याजवळ सापडले. गुहा सापडली असून संगणक हार्ड डिस्क, १२०० नव्या नोटा, ७ हजार जुन्या नोटा,  लॅपटॉप, ओबी व्हॅन आदी या शोध मोहिमेत हाती लागले आहे.

हरियाणातील सिरसा येथील गुरमीत बाबा राम रहिमच्या डेरा सच्चा सौदाची लष्कर आणि हरियाणा पोलिसांकडून झाडाझडती  करण्यात येत आहे. त्यासाठी ५००० लष्कर तैनात करण्यात आले आहेत. जेसीबी, १० लोहार, पोलीस, घोड्यावरुन पोलीस गस्त सुरु आहे. निमलष्करी दलाची ४१ पथकं, लष्कराच्या ४ तुकड्या, पोलिसांचा ताफा, डॉग स्क्वॉड आणि बॉम्ब स्क्वॉडनं डेऱ्यात प्रवेश केला. 

बाबा रामरहिमचे स्वतःचं चलन, लॅपटॉप आणि रोकड आढळलीय. या डे-यात बाबा राम रहिमनं स्वतःचं असं वेगळं चलन सुरु केलं होतं. 1, 2, 5 आणि दहा रुपये किंमतीचं वेगळं चलन या सर्च ऑपरेशनमध्ये सापडलेय. कुणाला हे चलन खरेदी करायचं असेल तर भारतीय चलन देऊन त्याला राम रहीमचं हे चलन घ्यावं लागत असे. 

बाबा राम रहीमच्या वॉर्डरोबमध्ये दीड हजार बूट, तीन हजार डिझायनर कपडे, पलंगही सापडलेत. याशिवाय पाचशे आणि हजाराच्या चलनातून रद्द झालेल्या जुन्या नोटाही जप्त करण्यात आल्यात. राम रहीमला गाड्यांचा तसंच गाड्या मॉडिफाय करुन त्या वापरण्याचाही त्याला शौक होता. त्याच्या डे-यातून नंबर नसलेल्या लक्झरी गाड्याही जप्त करण्यात आल्यात.