इतकं महाग? दिवाळीच्या सुट्ट्यांचे बेत रखडले; विमान प्रवासाचे दर पाहून अनेकांना फुटला घाम...

Diwali Holidays 2023 : दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये एखाद्या छानशा ठिकाणी भटकंतीसाठी जाण्याचा बेत तुम्हीही आखताय का? खिशाला चांगलीच कात्री लागणार आहे....   

सायली पाटील | Updated: Sep 13, 2023, 08:20 AM IST
इतकं महाग? दिवाळीच्या सुट्ट्यांचे बेत रखडले; विमान प्रवासाचे दर पाहून अनेकांना फुटला घाम... title=
Diwali holidays ticket airfare prices hike latest update

Diwali Holidays 2023 : अवघ्या काही दिवसांवर गणेशोत्सव आला असला तरीही बाप्पासाठीच्या तयारीसोबतच अनेकांनी पुढील काही दिवसांसाठीचेही बेत आखण्यास सुरुवात केली आहे. अर्थात येत्या दिवसांत असणारे सण आणि सुट्ट्यांबाबतच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. दरसा, त्यामागोमाग दिवाळी आणि त्यानिमित्त मिळणाऱ्या सुट्ट्या अशी सारी आकडेमोड करत प्रत्येकजण आपल्या परिनं सुट्टीच्या निमित्तानं एखाद्या छानशा ठिकाणी भटकंतीसाठी जाण्याचा बेत आखताना दिसतंय. 

तुम्हीही त्यापैकीच एक आहात का? दिवाळीच्या सुट्टीसाठी तुम्हीही काही ठिकाणांची यादी तयार केली आहे? तुमचा हा बेत रखडब शकतो किंवा तुम्हाला त्यासाठी वाजवीहून जास्त पैसे भरावे लागू शकतात. कारण, विमानप्रवास महागला आहे. प्रवासाच्या बरेच दिवस आधी अर्थात आगाऊ तिकिटं काढूनही अनेकांना त्यासाठी जवळपास 90 टक्के महाग दरानं तिकिटांची खरेदी करावी लागली आहे. मागणीत वाढ झाली असून, सेवांचा पुरवठा कमी असल्यामुळं ही परिस्थिती ओढावल्याचं आता स्पष्ट होत आहे. 

विमान प्रवास सोयीचा की महागाईचा? 

प्रवासात खर्च होणारा वेळ वाचवत तो वेळ भटकंतीसाठी देण्याच्या हेतूनं अनेकजण रेल्वे किंवा रस्तेमार्गानं प्रवास करण्याऐवजी विमान प्रवासाला प्राधान्य देतात. पण, आता मात्र विमान प्रवासाचे दर पाहता हा खर्च बऱ्याचजणांना परवडणारा नाही हेच आता स्पष्ट होकत आहेत. मागील काही काळापासून गो फर्स्टची काही विमानं सेवेतून बाद करण्यात आली आहेत. तर, स्पाईस जेटही त्याच यादीत येत आहे. एअर इंडिया, इंडिगो आणि इतर कंपन्यांनी घेतलेली नवी विमानं इतक्या कमी कालावधीत सेवेत रुजू होणार नसल्यामुळं त्याचे थेट परिणाम तिकीटांच्या दरांवर होताना दिसत आहेत. 

नोव्हेंबर 10 ते 15 दरम्यानचे तिकीट दर (परतीच्या प्रवासासह) 

मुंबई - दिल्ली - 18944 रुपये 
मुंबई - बंगळुरू - 106888 रुपये 
मुंबई - गोवा - 11479 रुपये 
मुंबई- कोलकाता - 25339 रुपये 
मुंबई- श्रीनगर - 35227 रुपये 

हेसुद्धा वाचा : ISRO चे दोन अंतराळवीर NASA च्या इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर जाणार; G20 परिषदेत PM मोदींसोबत करार

 

विमानानं प्रवास करणाऱ्यांच्या संख्येत गेल्या काही वर्षांमध्ये मोठी वाढ झाली आहे. त्यातच बहुतांश लहान शहरांमध्येही विमानतळं सुरु झाल्यामुळं शहरी धकाधकीपासून दूर असणाऱ्या ठिकाणी जाण्यालाच अनेकजण प्राधान्य देताना दिसतात. ज्यामुळं विमानानं प्रवास करणाऱ्यांचा आकडा दिवसागणिक वाढताना दिसत आहे. देशातील प्रमुख शहरांतून बंगळुरू, मुंबई, अहमदाबाद, चेन्नई, जयपूर, श्रीनगर, कोलकाता आणि गोवा या शहरांमध्ये विमान प्रवासातून ये- जा करणाऱ्यांची संख्या मोठी असून, 10 ते 16 नोव्हेंबरदरम्यान या ठिकाणांवरील विमान प्रवासाचे दर वाढले असल्याचं लक्षात येत आहे.