कुत्र्याच्या लग्नासाठी मंडप सजला, वऱ्हाडी मंडळी जमली! पण झालं की...

Dog Bride And Groom: सोशल मीडियावर रोज अनेक बातम्या आणि किस्से व्हायरल होत असतात. सोशल मीडिया (Social Media) मोबाईलवर सर्च करत असताना काही बातम्या नजरेस पडल्या की आश्चर्याचा धक्का बसतो. खरंच असं असतं का? असा देखील प्रश्न पडतो. कुत्र्याच्या लग्नाची अशीच एक बातमी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

Updated: Nov 13, 2022, 10:21 PM IST
कुत्र्याच्या लग्नासाठी मंडप सजला, वऱ्हाडी मंडळी जमली! पण झालं की... title=

Dog Bride And Groom: सोशल मीडियावर रोज अनेक बातम्या आणि किस्से व्हायरल होत असतात. सोशल मीडिया (Social Media) मोबाईलवर सर्च करत असताना काही बातम्या नजरेस पडल्या की आश्चर्याचा धक्का बसतो. खरंच असं असतं का? असा देखील प्रश्न पडतो. कुत्र्याच्या लग्नाची अशीच एक बातमी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. शेरू नावाच्या कुत्र्याचं स्वीटी नावाच्या कुत्रीशी लग्न करण्याचं ठरलं. लग्न थाटामाटात करण्याचं आयोजन करण्यात आलं. लग्नासाठी 100 जणांना आमंत्रण दिलं गेलं. लग्नासाठी मंडप बांधण्यात आला. वऱ्हाडी मंडळी देखील आली. पण या लग्नातही बॉलिवूड चित्रपटासारखा ट्विस्ट आला. ऐन लग्नाच्या वेळी असं काय झालं की, वऱ्हाडी मंडळींची कुजबूज सुरु झाली. त्यामुळे लग्नाचं आयोजन करणाऱ्यांना टेन्शन वाढलं. नेमकं काय झालं हेच काही जणांना कळेना. पण आयोजकांनी लग्न होणारच असं सांगितलं. 

13 नोव्हेंबरला बँड आणि वरातींसह वऱ्हाडी मंडळी मंडपात पोहोचली. पण लग्नावेळी नवरदेव असलेला शेरू गायब झाल्याने गोंधळ निर्माण झाला होता. त्यामुळे मंडपातील प्रत्येक जण शेरूला शोधत होता. लग्नमंडपात असलेल्या एका महिलेनं सांगितलं की, "नवरदेव शेरू गायब झाल्याने गोंधळ झाला आहे. पण लग्न तर होऊनच राहील." त्यानंतर नवरदेवाची शोधाशोध सुरु झाली.

अरं बाप! या व्यक्तीनं केलेला स्टंट पाहून तुम्हीही व्हाल आवाक्, पाहा Video

अखेर पळून गेलेल्या शेरू कुत्र्याला शोधण्यात यश आलं आणि त्याला मंडपात आणण्यात आलं. तसेच मोठ्या धुमधडाक्यात शेरू आणि स्वीटीचं लग्न पार पडलं. हा संपूर्ण प्रकरण हरयाणातील गुरुग्राम येथील पालम विहार भागातील आहे. ही बातमी सोशल मीडियावर वाचल्यानंतर लोकं आपल्या प्रतिक्रिया नोंदवत आहेत.