Lalu Yadav : लालूप्रसाद यादव मोठ्या संकटात! ईडीच्या छाप्यात मुलींच्या घरात सापडल्या 'या' मौल्यवान वस्तू ?

Lalu Yadav ED Raid : महाराष्ट्रात राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्या कोल्हापूर येथील घरात ईडीने छापा मारला तर त्याचवेळी बिहारमध्येही ईडीने छापा मारला. माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव ( Lalu Prasad Yadav) यांच्या जवळच्या नातेवाईक लोकांवर ईडीकडून छापे मारण्यात आले. त्यामुळे लालूप्रसाद यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

Updated: Mar 11, 2023, 01:51 PM IST
 Lalu Yadav : लालूप्रसाद यादव मोठ्या संकटात! ईडीच्या छाप्यात मुलींच्या घरात सापडल्या 'या' मौल्यवान वस्तू ? title=

Lalu Yadav ED Raid : राष्ट्रीय जनता दलाचे नेते आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव ( Lalu Prasad Yadav) हे ईडीच्या छापेमारीनंतर दुहेरी संकटात सापडले आहेत. ईडीच्या छाप्यात लालूप्रसाद यादव यांच्या मुलींच्या घरातून अनेक मौल्यवान वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत.  जमिनिच्या बदल्यात नोकरी (Land For Job Scam) असा मोठा गैरव्यवहार झाल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. तर दुसरीकडे सीबीआयने तेजस्वी यादव (Tejashwi Yadav) यांना चौकशीसाठी समन्स पाठवले आहे.

आज शुक्रवारी ईडीने दिल्ली-एनसीआर, मुंबई आणि बिहार, रांचीसह 24 ठिकाणी छापे टाकले. नोकरीच्या बदल्यात जमीन घोटाळ्यात लालू यादव यांच्या अडचणी कमी होत नाहीत. हा ईडीचा छापा 14 तासांहून अधिक काळ चालला. यादरम्यान ईडीच्या पथकाने सोने, दागिने, रोख रक्कम आणि विदेशी चलनही जप्त केले. 

दरम्यान, सीबीआयने लालू यादव यांचा मुलगा आणि बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव (Tejashwi Yadav) यांनाही जमीन घोटाळ्याप्रकरणी समन्स पाठवले आहे. सीबीआयने तेजस्वी यादव यांना चौकशीसाठी बोलावले आहे. त्यामुळे लालूप्रसाद यादव हे आता दुहेरी संकटात आहेत.

ईडी छाप्यात घबाड सापडले...

ईडीच्या छाप्यादरम्यान लालूप्रसाद यादव यांच्या मुली आणि त्यांच्या निकटवर्तीयांच्या घरातून 540 सोन्याचे दागिने, 1.5 किलोचे दागिने, 53 लाख रुपये रोख आणि  अमेरिकन डॉलरसह काही विदेशी चलन देखील सापडले आहेत. लालूप्रसाद यादव यांच्या अत्यंत जवळचे मानले जाणारे आरजेडीचे माजी आमदार अबू दुजाना यांच्या निवासस्थानावर आणि कार्यालयावरही ईडीने छापे मारले आहेत.

कोणत्या प्रकरणात चौकशी सुरु आहे?

ईडीच्या छापेमारीनंतर आरजेडीचे माजी आमदार अबू दुजाना म्हणाले की, आम्ही कोणत्या प्रकरणात चौकशी करत आहोत हे आम्हाला माहिती नाही. अदानी आणि अंबानी यानी कोणता मोठा घोटाळा केला आहे, हे त्यांना विचारायला हवे. मात्र आमच्यासारख्यांना त्रास दिला जात आहे. लालूप्रसाद हे राजदचे नेते आहेत. आमचा छळ होत आहे. ईडीला इथे काही सापडले नाही, ते रिकाम्या हाताने माघारी गेले आहेत.

भाजपने प्रत्युत्तर दिले

ईडीच्या छाप्यानंतर भाजपकडून हल्लाबोल केला आहे. सुशील मोदी म्हणाले की, आज बिहारचे सर्वात मोठे जमीनदार लालूप्रसाद आणि त्यांचे कुटुंब आहे. तेजस्वी यादव यांनी इतक्या कमी वयात एवढी संपत्ती कशी मिळवली? यावर कोणतेही उत्तर न देता जेव्हा ईडी किंवा सीबीआय कारवाई होते तेव्हा ते इकडे तिकडे बोलतात.