दिल्लीत भूकंपाचे हादरे; ३.५ रिश्टर स्केल तीव्रता

सायंकाळी 5 वाजून 45 मिनिटांदरम्यान जाणवले हादरे.

Updated: Apr 12, 2020, 07:35 PM IST
दिल्लीत भूकंपाचे हादरे; ३.५ रिश्टर स्केल तीव्रता title=
संग्रहित फोटो

नवी दिल्ली : नोएडा, दिल्ली, गाझियाबादसह जवळपासच्या भागात भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. गुरुग्राम आणि फरीदाबादमध्येही भूकंपाचे हादरे जाणवले आहेत. 11 एप्रिल रोजी सायंकाळी 5 वाजून 45 मिनिटांदरम्यान हे हादरे जाणवले. हादरे इतके जाणवले की घरातील पंखे हलत असल्याची माहिती मिळत आहे. मिळालेल्या रिपोर्टनुसार, 3.5 रिश्टर स्केल इतकी भूकंपाची तीव्रता असल्याचं सांगण्यात आलं आहे. भूकंपामुळे कोणतंही नुकसान झाल्याची अद्याप माहिती नाही.

भूकंपाचं केंद्र दिल्ली असल्याचं सांगण्यात येत आहे. भूकंपाचं केंद्र जमिनीपासून आठ किमी खाली असल्याची माहिती आहे. भूकंपाच्या हादऱ्यांमुळे लोक लॉकडाऊन असतानाही घराबाहेर पडले.

याआधी गेल्या वर्षी 25 सप्टेंबर रोजी जवळपास साडे चारच्या सुमारास दिल्ली आमि जवळपासच्या भागात भूकंपाचे धक्के जाणवले होते. त्यावेळी भूकंपाचं केंद्र भारत-पाकिस्तान सीन असल्याचं सांगण्यात आलं होतं. भूकंपाची तीव्रता 6.3 रिक्टर स्केल इतकी मोजण्यात आली होती. याचं केंद्र लाहोरपासून 173 किलोमीटर दूर असल्याचं सांगण्यात आलं होतं. भारतात याचा सर्वाधिक फटका जम्मू-काश्मीरमध्ये बसला होता.