आताची मोठी बातमी! 'या' चीनी लोन अॅपवर EDची कारवाई, कंपनीचे करोडो रुपये गोठवले

अंमलबजावणी संचालनालयची (ED) चीन लोन अॅपवर मोठी कारवाई 

Updated: Sep 16, 2022, 04:26 PM IST
आताची मोठी बातमी! 'या' चीनी लोन अॅपवर EDची कारवाई,  कंपनीचे करोडो रुपये गोठवले title=

ED Action : अंमलबजावणी संचालनालयची (ED) चीन लोन अॅपवर मोठी कारवाई केली आहे. ईडीने Paytm, Easebuzz, Razorpay आणि Cashfree चे बँक अकाऊंट आणि व्हर्च्युअल अकाऊंटमध्ये असलेले 46.67 कोटी रुपये गोठवले आहेत. काही दिवसांपूर्वी ईडीने चीन लोन अॅपच्या कंपन्यांच्या कार्यालयांवर छापेमारी केली होती.

ईडीने 14 सप्टेंबरला दिल्ली, गाझियाबाद, लखनऊ, मुंबई आणि बिहारसह काही ठिकाणी छापे टाकले होते. याशिवाच HPZ लोन अॅपविरुद्ध दाखल असलेल्या मनी लॉण्ड्रींग प्रकरणात दिल्ली, गुरुग्राम, मुंबई, पुणे, चेन्नई, हैदराबाद, जयपूर, जोधपूर आणि बंगळुरुमध्ये असलेल्या PayTM, Easebuzz, Razorpay आणि Cashfree च्या 16 ठिकाणी छापेमारी केली होती.

Easebuzz अकाऊंटमध्ये सापडले 33.36 करोड
तपासात ईडीला या कंपन्यांच्या व्हर्च्युअल अकाऊंटमध्ये मोठी रक्कम आढळून आली. Easebuzz प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या अकाऊंटमध्ये तब्बल 33.36 कोटी रुपये आढळून आले असून Razorpay सॉफ्टवेअर प्रायव्हटे लिमिटेडच्या अकाऊंटमध्ये 8.21 रुपये, Cashfree पेमेंट्स इंडिया प्राइव्हेट लिमिटेडच्या अकाऊंटमध्ये 1.28 कोटी रुपये आणि PayTM सर्व्हिसेस लिमिटेडच्या अकाऊंटमध्ये 1.11 कोटी रुपये सापडले.

ईडी दिलेल्या माहितीनुसार या कंपन्यांच्या विविध बँक आणि व्हर्च्युअल अकाऊंटमध्ये 46.67 कोरटी रुपये गोटवण्यता आले आहेत. 

काय आहे प्रकरण?
HPZ Token ही एक अॅप बेस्ड कंपनी आहे. या कंपनीने युजर्सना बिटकॉईन आणि इतर क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूकीवर चांगला फायदा करुन देण्याचं आश्वासन दिलं होतं. सुरुवातीला युजर्सना कंपनीत गुंतवणूक केल्यास पैसे दुप्पट करण्याचे आमिष दाखवण्यात आलं. युजर्सकडून पैसे UPI किंवा इतर पेमेंट अॅपद्वारे घेतले जात होते. सुरुवातीला काही अंशी रक्कमही गुंतवणूकदारांना देण्यात आली. शिल्लक रक्कम विविध पेमेंट गेटवे आणि बँकांद्वारे विविध व्यक्ती आणि कंपन्यांच्या खात्यात हस्तांतरित केल्याचा आरोप आहे.

ईडीने या महिन्याच्या सुरुवातीला रेझरपे प्रायव्हेट लिमिटेड, कॅशफ्री पेमेंट्स, पेटीएम पेमेंट सर्व्हिसेस लिमिटेड आणि चिनी व्यक्तींद्वारे चालवल्या जाणाऱ्या संस्थांची झडती घेतली होती. शोध मोहिमेदरम्यान ते बनावट पत्त्याच्या आधारे काम करत असल्याचं आढळून आलं. चिनी व्यक्ती चालवत असलेल्या आयडी आणि बँक खात्यांमधून 17 कोटी रुपयांची रक्कम जप्त करण्यात आली आहे. शोध मोहिमेदरम्यान, ते बनावट पत्त्याच्या आधारे काम करत असल्याचे आढळून आले.