BJP Income: भाजपाची कमाई 1900 कोटी तर काँग्रेस शर्यतीत फारच मागे; जाणून घ्या राजकीय पक्षांची कमाई

income of bjp congress: निवडणूक आयोग दरवर्षी राजकीय पक्षांच्या कमाई आणि खर्चाची आकडेवारी जाहीर करते, नुकतीच 2021-22 या आर्थिक वर्षातील आकडेवारी जाहीर झाली  

Updated: Jan 18, 2023, 09:53 AM IST
BJP Income: भाजपाची कमाई 1900 कोटी तर काँग्रेस शर्यतीत फारच मागे; जाणून घ्या राजकीय पक्षांची कमाई title=
Income Of Bjp And Congress

Income Of Bjp And Congress: केंद्रीय निवडणूक आयोगाने (election commission) भारतीय जनता पार्टीसहीत काँग्रेस आणि अन्य मान्यता प्राप्त पक्षांच्या व्यवहारासंदर्भातील आकडेवारी सार्वजनिक केली आहे. या आकडेवारीनुसार सन 2021-22 मध्ये कमाईच्या बाबतीत भाजपा पहिल्या क्रमांकाचा राजकीय पक्ष आहे. तर भाजपाचा प्रमुख विरोधी पक्ष असलेला काँग्रेस या शर्यतीमध्ये फार मागे पडल्याचं चित्र दिसत आहे. निवडणूक आयोगाकडून दरवर्षी राजकीय पक्षांनी केलेला खर्च आणि कमाईची आकडेवारी जाहीर केली जाते. मागील वर्षभरातील आकडेवारी पहिल्यांदाच समोर आली आहे. 

भाजपाची कमाई किती खर्च किती?

निवडणूक आयोगाच्या या आकडेवारूनुसार सत्ताधारी भारतीय जनता पार्टीला आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये वेगवेगळ्या माध्यमातून एकूण 1 हजार 917 कोटी 12 लाख रुपयांचा निधी मिळाला. तर भाजपाचा एखूण खर्च 854 कोटी 46 लाख इतका झाला. यामध्ये भाजपाला निवडणूक बॉण्डच्या माध्यमातून 1 हजार 33 कोटी 70 लाखांचा निधी मिळाला आहे.

काँग्रेसची स्थिती काय?

विरोधी पक्षांचं नेतृत्व करणाऱ्या काँग्रेसला आर्थिक वर्ष 2021-22 च्या वार्षिक ऑडिट रिपोर्टमध्ये एकूण खर्च 400 कोटी 41 लाख इतका असल्याचं नमूद केलं आहे. तर काँग्रेसची कमाई 541 कोटी 27 लाख रुपये इतकी आहे. काँग्रेसला 347 कोटी 99 लाख रुपये अनुदान आणि देणगी स्वरुपात मिळाले आहेत. तृणमूल काँग्रेसच्या कमाईमध्ये 633 टक्क्यांची वाढ झाली आहे. सन 2020-21 मधील 74.4 कोटी कमाई असलेल्या तृणमूलची 2021-22 मध्ये एकूण 545 कोटी 70 लाख कमाई झाली आहे. 

स्थानिक पक्षांची आकडेवारी

याशिवाय कम्युनिस्ट पार्टीला (भाकपा) आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये आपल्या वार्षिक ऑडिट रिपोर्टमध्ये 2 कोटी 87 लाख रुपयांची निधी मिळाला. तर भाकपाने त्यापैकी 1 कोटी 18 लाख रुपये खर्च केला. मंगळवारी निवडणूक आयोगाने ही आकडेवारी सार्वजनिक केली. स्थानिक पक्षांपैकी डीएमकेला याच आर्थिक वर्षात 318 कोटी 70 लाख रुपये निधी मिळाला. त्यानंतर बीजेडीला 307 कोटी 20 लाख रुपये, टीआरएसला 279 कोटी 40 लाख रुपये, व्हायआरएसला 93 कोटी 70 लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे.