Electric Bike | 'या' आहेत भारतीय बाजारातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक मोटारसायकल

स्टार्टअप कंपनी रिव्हॉल्टने सर्वप्रथम आपली इलेक्ट्रिक बाइक लाँच केली. तेव्हापासून 3 ते 4 कंपन्या बाजारात दाखल झाल्या आहेत.

Updated: Jan 21, 2022, 08:19 AM IST
Electric Bike | 'या' आहेत भारतीय बाजारातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक मोटारसायकल title=

मुंबई : इलेक्ट्रिक वाहने वेगाने भारतीय बाजारपेठेत प्रवेश करत आहेत. सुरुवातीला इलेक्ट्रिक टू व्हीलरचे नाव ऐकले की फक्त मोपेड किंवा स्कूटरसारख्या वाहनांचेच चित्र डोळ्यासमोर येते. पण आता इलेक्ट्रिक बाइक्स म्हणजेच मोटारसायकलही भारतीय बाजारात दाखल झाल्या आहेत. या ई मोटरसायकल पेट्रोल मोटरसायकलच्या तुलनेत तुमचा खर्च देखील वाचवतात.

भारतात स्टार्टअप कंपनी रिव्हॉल्टने सर्वप्रथम इलेक्ट्रिक बाइक लाँच केली. तेव्हापासून 3 ते 4 कंपन्या बाजारात दाखल झाल्या आहेत. विशेष म्हणजे यापैकी कोणतीही कंपनी प्रस्थापित ब्रँड नाही. भारतीय इलेक्ट्रिक वाहन बाजारात सध्या कोणते पर्याय उपलब्ध आहेत ते पाहूया

Revolt RV 400

Revolt RV 400

रिव्हॉल्टने पहिल्यांदाच इलेक्ट्रिक मोटरसायकल भारतीय बाजारात आणली होती. Revolt RV 400 चा टॉप स्पीड 80 kmph आहे. ही बाईक पूर्ण चार्ज केल्यावर 150 किमी पर्यंतची रेंज देते.

बाईकची बॅटरी चार्ज होण्यासाठी 4.5 तास लागतात. बाइकमध्ये तीन रायडिंग मोड देण्यात आले आहेत. हे मोड्स ECO, नॉर्मल आणि स्पोर्ट आहेत. या इलेक्ट्रिक बाइकला 100 किमी पर्यंत चालवण्याचा खर्च 9 रुपये इतका असेल.

Gravton Quanta

Gravton Quanta
ग्रॅव्हटन क्वांटा ही इलेक्ट्रिक बाइक सेगमेंटमधील एक स्टायलिश मोटरसायकल आहे. यामध्ये कंपनीने 3 kW ची BLDC मोटर दिली आहे. ज्यासोबत 3 kWh लिथियम आयन बॅटरी देण्यात आली आहे. पूर्ण चार्ज केल्यानंतर ही बाईक 150 किमी चालते असा कंपनीचा दावा आहे.

फास्ट चार्जिंग सिस्टमच्या मदतीने 90 मिनिटांत पूर्ण चार्ज होऊ शकतो. नियमित चार्जरने चार्ज केल्यावर ते 3 तासांत चार्ज होते. कंपनी या बॅटरीवर 5 वर्षांची रिप्लेसमेंट वॉरंटी देत ​​आहे.

किंमत: रु.99 हजार पासून सुरू

Odysse Evoqis

Odysse Evoqis

2021 साली भारतीय बाजारपेठेत दाखल होणारी आणखी एक बाईक म्हणजे Odysse Evoqis. कंपनीने या बाईकमध्ये 4.32 kW ची लिथियम-आयन बॅटरी दिली आहे. बाईक पूर्णपणे चार्ज होण्यासाठी 6 तास लागतात. यामध्ये, 3000 W ची इलेक्ट्रिक मोटर 4.3 KW ची पॉवर आणि 64 Nm चा पीक टॉर्क जनरेट करू शकते. यात अँटी थेफ्ट लॉक, मोटर कट ऑफ स्विच आणि कीलेस एंट्री सारखी वैशिष्ट्ये आहेत. बाईकचा टॉप स्पीड 80 किमी/तास आहे. पूर्ण चार्ज केल्यावर ही बाईक 140 किमीची रेंज देते.

Kabira KM 4000

Kabira KM 4000

इलेक्ट्रिक बाईक्समध्ये स्पोर्ट्स बाईकच्या लुकसाठी कबीरा केएम 4000 हा उत्तम पर्याय आहे. यामध्ये कंपनीने 5000 वॅटच्या BLDC मोटरसह 4.4 kWh ची बॅटरी दिली आहे. या बाइकला पूर्ण चार्ज होण्यासाठी 2 तास 50 मिनिटे लागतात. पूर्ण चार्ज केल्यानंतर ही बाईक 150 किमी चालते असा कंपनीचा दावा आहे. ज्यामध्ये तुम्हाला 120 किलोमीटर प्रति तासाचा टॉप स्पीड मिळेल.

Joy e-bike Monster

Joy e-bike Monster

भारतीय बाजारात सध्या असलेल्या इलेक्ट्रिक बाइक्समध्ये जॉय ई-बाईक मॉन्स्टरचाही समावेश आहे. लिथियम आयन बॅटरीने सुसज्ज असलेल्या या बाइकमध्ये 250W DC ब्रॅशलेस हब मोटर आहे. ही बाईक 4 ते 4.5 तासात फुल चार्ज होते. कंपनीच्या म्हणण्यानुसार, पूर्ण चार्ज केल्यावर ते 75 किमीची रेंज देते.

कीमत 98,666 रुपये : एक्स-शोरूम 

Tork Kratos

Tork Kratos

प्रजासत्ताक दिनी म्हणजेच 26 जानेवारीला आणखी एक बाईक बाजारात दाखल होणार आहे. टॉर्क क्रॅटोस ही मेड इन इंडिया इलेक्ट्रिक मोटरसायकल आहे. पूर्ण चार्ज केल्यावर 100 किमीची रेंज मिळण्याची शक्यता आहे.

Bob-e

Bob-e

स्वदेशी स्टार्टअप Ignitron Motocorp Pvt Ltd ने Cyborg ब्रँडअंतर्गत 'बॉब ई' नावाने आपली दुसरी 'मेड इन इंडिया' इलेक्ट्रिक बाइक सादर केली आहे. . ही इलेक्ट्रिक बाइक प्रामुख्याने स्टायलिश स्पोर्टी लूकसह आणली गेली आहे. 
कंपनीने या बाइकमध्ये 2.88 kWh ची लिथियम-आयन बॅटरी दिली आहे. तसेच, ही बाईक ताशी 85 किमी वेगाने चालवता येते. पूर्ण चार्जनंतर जास्तीत जास्त 110 किमी धावू शकते.