दक्षिणेचा लोकप्रिय अभिनेता बनणार नेता, स्वत:च्या पक्षाची करणार घोषणा

Actor in Politics : चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांनी राजकारणात  प्रवेश केला आहे. यात आता आणखी एका अभिनेत्याचा समावेश झाला आहे. दक्षिणेचा लोकप्रिय अभिनेता राजकारणात पाऊस ठेवणार असून तो लवकरच तो स्वत::च्या पक्षाची घोषणा करणार आहे. 

राजीव कासले | Updated: Jan 26, 2024, 08:10 PM IST
दक्षिणेचा लोकप्रिय अभिनेता बनणार नेता, स्वत:च्या पक्षाची करणार घोषणा  title=

Actor in Politics : बॉलिवूड ते टॉलीवूडपर्यंतच्या अनेक कलाकारांनी राजकारणात प्रवेश केला आहे. राजकारणात (Politics) अनेक  कलाकार यशस्वी झाले असून काही कलाकार आमदार, खासदारही बनलेत. तर अनेकांना स्वत:चा पक्ष स्थापन केला आहे. यात आता आणखी एका अभिनेत्याचा समावेश झाला आहे. आता आणखी युवा लोकप्रिय अभिनेत्याने राजकारणात प्रवेश करण्याचे संकेत दिले आहेत. हा अभिनेता भाजप, काँग्रेस कि आणख कोणत्या पक्षात जाणार याबाबत शक्यता वर्तवली जात होती. पण हा अभिनेता कोणत्याही पक्षात न जाता स्वत:चाच पक्ष स्थापन करणार असल्याचं बोललं जात आहे. 

दक्षिणेचा लोकप्रिय अभिनेता राजकारणात
दक्षिणेचा लोकप्रिय अभिनेता थलापती विजय (Thalapathy Vijay) लवकरच कमल हसन आणि रजनीकांत यांच्या पावलावर पाऊल ठेवणार आहे. थलापती विजयचे निकटवर्तीय मानले जाणारे विजय मक्कल इयक्कम यांनी या बातमीला दुजोरा दिला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी याबाबतचा निर्णय येणं अपेक्षित आहे. या संदर्भात 25 जानेवारीला एक बैठकही पार पडली. या बैठकीत नव्या पक्षाची स्थापना करण्यावर एकमत झालं. दक्षिणेत (South) थलापती विजयचा मोठा फॅन फॉलोईंग आहे. याशिवाय सामाजिक कार्यातही थलापती विजय आघाडीवर असतो. त्यामुळे त्याला मानणारा एक मोठा वर्ग आहे. याचा त्याला राजकारणात फायदा होऊ शकतो. 

यााआधी थलापती विजयचा तामिळनाडूतल्या राजकीय कार्यक्रम आणि स्थानिक निवडणुकांमध्ये सक्रिय सहभाग पाहिला मिळालाय. सोशल मीडियावरही थलापती विजयचे लाखोंनी फॉलोअर्स आहेत. त्यामुळे विजयची राजकारणात कशी सुरुवात होते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. दक्षिण चित्रपटसृष्टीत थलापती विजयने अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. त्याच्या अनेक चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर तगडी कमाई केलीय. 2018 मद्ये थुथ्कुडी इथल्या पोलीस गोळीबाराच्या घटनेनंतर थलापती विजयचा राजकारणात वावर वाढला. थलापती विजय 2026 मध्ये राजकारणात प्रवेश करेल अशी शक्यता वर्तवली जात होती. पण त्याआधीच म्हणजे याचवर्षी लोकसभा निवडणूकीपूर्वी राजकारणात एन्ट्री करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

अनेक अभिनेते बनले नेते
राजकारणात प्रवेश करणारा थलापती विजय हा पहिला अभिनेता नाही. याआधी दक्षिण चित्रपटसृष्टीतील अनेक अभिनेत्यांनी राजकारणात आपलं भविष्य आजमावलं आहे. यात एन टी रामा राव, जयललिता, चिरंजीव, कमल हसन, पवन कल्याण रजनीकांत, सुरेश गोपी यांचा समावेश आहे. बॉलिवूडमधल्याही (Bollywood) अनेक कलाकारांनी राजकारणात प्रवेश केला आहे.