अनुच्छेद ३७० विरोधात आंदोलन; फारुक अब्दुल्लांची बहिण, मुलगी पोलिसांच्या ताब्यात

बहिण सुरैया आणि मुलगी साफिया यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

Updated: Oct 15, 2019, 03:11 PM IST
अनुच्छेद ३७० विरोधात आंदोलन;  फारुक अब्दुल्लांची बहिण, मुलगी पोलिसांच्या ताब्यात title=
संग्रहित फोटो

श्रीनगर : जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुक अब्दुल्ला यांची बहिण सुरैया आणि मुलगी साफिया यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या दोघी अनुच्छेद ३७० विरोधातील आंदोलनात सामिल झाल्या होत्या. त्यावेळी त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

जम्मू-काश्मीरमधून अनुच्छेद ३७० हटवल्यापासून माजी मुख्यमंत्री फारुक अब्दुल्ला आणि त्यांचा मुलगा नजरकैदेत आहेत. ८१ वर्षाय फारुक अब्दुल्ला श्रीनगरस्थित त्यांच्या निवासस्थानी नजरकैदेत आहेत. तर ओमर अब्दुल्ला स्टेट गेस्ट हाउसमध्ये नजरकैदेत आहेत.

काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय परिषदेच्या नेत्यांच्या १५ सदस्यीय शिष्टमंडळाने फारुक यांची श्रीनगर येथील त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली होती. तसेच शिष्टमंडळाने ओमर अब्दुल्ला यांचीही भेट घेतली होती.