पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन; लष्कराचे प्रत्युत्तर

गोळीबाराला भारतीय सेनेकडून प्रत्युत्तर

Updated: Oct 15, 2019, 02:32 PM IST
पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन; लष्कराचे प्रत्युत्तर title=
संग्रहित फोटो

श्रीनगर : मंगळवारी पाकिस्तानकडून पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले. जम्मू-काश्मीरमधील पुंछ जिल्ह्यात नियंत्रण रेषेवर छोट्या हत्यारांनी गोळीबारही करण्यात आला. पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या या गोळीबाराला भारतीय सेनेकडून प्रत्युत्तर देण्यात आले. 

मंगळवारी सकाळी साडे नऊच्या सुमारास पाकिस्ताकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले. पाकिस्तानने पुंछमधील कस्बा आणि किरनी सेक्टरमध्ये गोळीबार केल्याची माहिती मिळत आहे.

गेल्या तीन  दिवसांपूर्वी जम्मू-काश्मीरमधील राजौरी सेक्टरमध्ये पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले होते. याला भारतीय सेनेने सडेतोड उत्तर दिले होते. तसेच काही दिवसांपूर्वी जम्मू-काश्मीरमधील  हरी सिंह रस्त्यावर दहशतवाद्यांनी ग्रेनेड हल्ला केला होता. आधीही अनेकदा पाकिस्तानकडून अनेक कुरापती करण्यात आल्या आहेत.