दिल्ली-जामिया नगरमध्ये पुन्हा गोळीबार

दुचाकीवरून आलेल्या अज्ञातांचा गोळीबार 

Updated: Feb 3, 2020, 07:36 AM IST
दिल्ली-जामिया नगरमध्ये पुन्हा गोळीबार  title=

नवी दिल्ली : जामिया विद्यापिठाच्या विद्यार्थांनी काढलेल्या रॅली दरम्यान एका तरूनाने गोळीबार केला होता. या गोळीबारात एक विद्यार्थी जखमी झाल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा जामिया विद्यापीठात गोळीबार केल्याची घटना घडली आहे. या घटनेमध्ये कोणीही जखमी झाले नाही. जामिया विद्यापीठाबाहेर गोळीबाराची घटना घडली आहे.

गेट नं ५च्या बाहेर गोळीबाराची घटना घडली आहे. दुचाकीवरून आलेल्या अज्ञातांनी गोळीबार केला आहे. या अज्ञातांविरोधात पोलिसांमध्ये गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. याठिकाणी ही तिसरी गोळीबाराची घटना आहे. 

३० जानेवारी रोजी झालेल्या गोळीबारापुर्वी तरुणाने फेसबुकवर स्टेटस टाकलं होतं. एका स्टेटसमध्ये त्याने 'आजादी दे रहा हूं' असं लिहिलं, तर दुसऱ्या स्टेटसमध्ये त्याने 'मी इकडे एकमेव हिंदू आहे, माझ्या घराची काळजी घ्या. शाहीन बाग खेल खत्म,' असं लिहिलं. 'माझ्या अंतयात्रेत मला भगवी वस्त्र परिधान करा आणि जय श्रीरामच्या घोषणा द्या', असं स्टेटसही आरोपीने टाकलं होतं.

गोळीबार करणारा हा हल्लेखोर अल्पवयीन असल्याची माहिती समोर आली आहे. आधार कार्डवर असलेल्या माहितीनुसार तो १७ वर्षांचा आहे. हल्लेखोर गौतम बुद्ध नगर (नोएडा)च्या जेवरमधल्या घोडीवाला भागात राहतो. गोपालच्या वडिलांचं पानाचं दुकान असल्याचंही सांगितलं जात आहे.