फ्लिपकार्ट, अमेझॉन देतायत ४२,००० नोकऱ्या

 सॉर्टिंग, डिलिव्हरी स्टेशन्स आणि ग्राहक सेवा केंद्र या विभागात या नोकऱ्या आहेत.

Pravin.Dabholkar Pravin Dabholkar | Updated: Sep 25, 2017, 06:31 PM IST
फ्लिपकार्ट, अमेझॉन देतायत ४२,००० नोकऱ्या title=

मुंबई : गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा नोकऱ्यांच्या संख्येत २५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. जगभरात ऑनलाइन शॉपिंगची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे ज्यामुळे यासाठी कर्मचार्यांची मागणीदेखील वाढत आहे. सॉर्टिंग, डिलिव्हरी स्टेशन्स आणि ग्राहक सेवा केंद्र या विभागात या नोकऱ्या आहेत. या नोकऱ्या कायमस्वरूपी नसल्या तरी हंगामी स्वरूपात मोठ्या प्रमाणात ही भरती होत आहे.

१.३ लाख हंगामी रोजगार 

एचआर फर्मच्या मते, या वर्षी सुमारे १.३ लाख हंगामी नोकऱ्या निर्माण होऊ शकतात.  यामध्ये सर्वांत मोठे योगदान भारतातील सर्वात मोठी ई-कॉमर्स कंपनी असलेल्या फ्लिपकार्ट आणि अमेझॉन यांचे आहे. या कंपन्या उत्सव हंगामात ४२ हजाराहून अधिक हंगामी नोकऱ्या तयार करत आहेत.
फ्लिक्कार्टच्या प्रवक्त्याने सांगितले की, वाढत्या विक्रीमुळे फ्लिपकार्टने या फेस्टिवलमध्ये ग्राहकांची मागणी पूर्ण करण्यासाठी २० हजाराहून अधिक तात्पुरत्या स्वरुपाच्या वितरण आणि सेवा पुरविल्या आहेत.

फ्रेशर्सच्या संख्येत ३० ते ४० टक्क्यांनी वाढ 

मॅनपॉवर ग्रुपच्या मते, तात्पुरत्या स्वरूपात काम करणाऱ्या कर्मचार्यांचे वेतन किरकोळ वाढले आहे. याव्यतिरिक्त, फ्रेशर्सनाही नोकरी दिली जाते.
आता बर्याचशा कौशल्य सरकारी कार्यक्रमाच्या माध्यमातून बर्याच फ्रेशर्सना प्रशिक्षण देऊन नोकरी दिली जाऊ शकते. यावर्षी या संख्येत३० ते ४० टक्क्यांनी वाढ होत असल्याचे पाहत आहोत.