माजी मुख्यत्र्यांच्या मुलीने संपवलं आयुष्य; धक्कादायक कारण समोर

राहत्या घरीच माजी मुख्यमत्र्यांच्या मुलीने आपलं आयुष्य संपवलं आहे

Updated: Aug 1, 2022, 06:20 PM IST
माजी मुख्यत्र्यांच्या मुलीने संपवलं आयुष्य; धक्कादायक कारण समोर title=

नवी दिल्ली : आयुष्यात अडणचणींवर मात करत पुढे जायचं असं म्हणतात. पण काही जण आयुष्य संपवण्याचा पर्याय स्विकारतात. माजी मुख्यंत्र्यांच्या मुलीनेही आलेल्या अडचणींना सामोरं न जाता आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला.

आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री एनटी रामाराव यांच्या मुलीने सोमवारी आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. एनटी रामाराव यांच्या मुलीने हैदराबाद येथील जुबली हिल्स येथील राहत्या घरी आत्महत्या करत आपलं आयुष्य संपवलं आहे.

एनटी रामाराव यांच्या मुलीला  आरोग्य विषयक काही समस्या होत्या आणि गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. डॉक्टरांनी सांगितले की, प्राथमिक तपासानुसार, प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्या डिप्रेशनमध्ये होत्या.

याप्रकरणी आता गुन्हा दाखल करण्यात आला असून मृतदेह उस्मानिया रुग्णालयात हलवण्यात आला आहे. एनटी रामाराव यांच्या मुलीच्या निधनाने संपूर्ण एनटीआर कुटुंबावर शोककळा पसरली आहे. एनटीआरच्या कुटुंबातील इतर सदस्य त्यांच्या घरी पोहोचले आहेत.