जपानच्या पंतप्रधानांनंतर आता या देशाचे राष्ट्राध्यक्ष करणार गंगा आरती

काही दिवसांपूर्वी जपानचे पंतप्रधान शिंजो आबे भारत दौऱ्यावर आले होते. तेव्हा पंतप्रधान मोदींनी त्यांच्यासोबत गंगा आरती केली होती.

shailesh musale शैलेश मुसळे | Updated: Mar 5, 2018, 05:45 PM IST
जपानच्या पंतप्रधानांनंतर आता या देशाचे राष्ट्राध्यक्ष करणार गंगा आरती title=

नवी दिल्ली : काही दिवसांपूर्वी जपानचे पंतप्रधान शिंजो आबे भारत दौऱ्यावर आले होते. तेव्हा पंतप्रधान मोदींनी त्यांच्यासोबत गंगा आरती केली होती.

गंगा आरतीचं आयोजन दशाश्वमेध आणि अस्सी यापैकी एका घाटावर पुन्हा होऊ शकतं. कारण फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष एमॅनुअल मॅक्रॉन ९ मार्चला भारत दौऱ्यावर येत आहेत. १२ मार्चला ते वाराणसीला जाणार आहेत. पीएम मोदी फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांना सोबत घेऊन एका बुलेटप्रूफ बोटमध्ये काशी यात्रा करणार आहेत. या दरम्यान ते गंगा आरती देखील करणार आहेत.

राष्ट्राध्यक्ष एमॅनुअल मॅक्रॉन या दौऱ्यात भारत आणि फ्रांस यांच्यातील संरक्षण आणि अनेक मोठे करार करणार आहेत. मॅक्रॉनच्या यात्रेदरम्यान जैतापूर न्यूक्लियर पॉवर प्रोजेक्टचा करार होण्याची देखील शक्यता आहे.

इंटरनेशनल सोलर अलायंसच्या बैठकीत देखील दोन्ही नेते सहभागी होतील. ही त्यांची पहिली बैठक आहे. सौर ऊर्जेचा योग्य वापर याबाबत पंतप्रधान मोदी आणि माजी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष फ्रांसिस हॉलेंडे यांनी २ वर्षांपूर्वी काम सुरु केलं होतं. मॅक्रॉन यांच्यासोबत त्यांची पत्नी ब्रिगिटे मेराइ-क्लाउडे मॅक्रॉन देखील भारतात येणार आहेत.