Gold Price Today : सोन्याचे दर रोकॉर्ड ब्रेक उंचीवर, लवकरचं गाठणार 55 हजारांचा टप्पा

18 महिन्यांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचले सोन्याचे दर, आणखी वाढणार का दर? वाचा सविस्तर बातमी   

Updated: Mar 9, 2022, 03:36 PM IST
Gold Price Today : सोन्याचे दर रोकॉर्ड ब्रेक उंचीवर, लवकरचं गाठणार 55 हजारांचा टप्पा title=

मुंबई : रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाचे पडसाद संपूर्ण जगावर उमटताना दिसत आहे. युद्धाच्या 14 व्या दिवशी सोनं आणि कच्च तेल सर्वोच्च पातळीवर पोहोचले आहेत. सोन्याचे दर 18 महिन्यांनंतर पुन्हा वाढले आहेत. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) नुसार बुधवारी सकाळी 10 ग्रॅम सोन्याचे दर 55 हजार रूपयांपर्यंत पोहोचले आहेत. फक्त सोनं नाही तर चांदीच्या दरांत देखील मोठी वाढ झाली आहे. 

चांदीच्या दरांत 1.8 टक्क्यांनी वाढ झाली आहे. आज सोन्याचे दर 1.4 टक्क्यांनी सोन्याचे दर वाढले आहेत. आज 10 ग्रॅम सोन्यासाठी 55 हजार 190 रूपये मोजावे लागत  आहे. 

तर दुसरीकडे 1 किलोग्रॅम चांदीसाठी 72 हजार 689 रूपये मोजावे लागत आहेत. महत्त्वाचं म्हणजे जर रशिया आणि युक्रेनमध्ये युद्धजन्य परिस्थिती अशीचं राहिली तर सोनं आणि चांदीचे दर आणखी वाढू शकतील... असं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे. 

युद्धामुळे सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. भारतीय बाजारात सोनं हजार रुपयांनी महागलं तर चांदीतही झळाळी आहे. सोन्या चांदीचे भावही कडाडले आहेत. रशिया-युक्रेन युद्धाचा फटका जगाला बसू लागलाय...2008 नंतर कच्च तेल सर्वोच्च पातळीवर पोहोचलंय...