Gold Price Today: सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात वाढ; पाहा काय आहेत तुमच्या शहरातील सोन्याचे दर...

Gold Price Today: सध्याच्या सणासुदीच्या काळात महागाईनं मध्यमवर्गीयांची (Inflation) झोप उडवली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये इंधनदरवाढ, सोन्या-चांदीचे भावही वाढताना दिसत आहेत. चला तर मग जाणून घेऊया ऐन लग्नसराईच्या मौसमात सोन्याचे दर हे (Gold Price Today in Mumbai) कितीनं वाढले आहेत आणि तुमच्या खिशावर त्याच्या कसा परिणाम (Gold Price Today in Pune) होणार आहे. 

Updated: Mar 20, 2023, 07:58 AM IST
Gold Price Today: सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात वाढ; पाहा काय आहेत तुमच्या शहरातील सोन्याचे दर...  title=
gold price today know the gold price rates in your city on the occasion of gudi padwa and wedding season

Gold Price Today: सध्या सणासुदीचा आणि लग्नसराईचा मोहोल (Wedding Season) सुरू आहे त्यामुळे आपल्याकडे सोनं खरेदीचीही रेलचेल सुरू झाली असेल परंतु आज तुम्ही जर का सोनं खरेदी (Buying Gold Price) करायला जाणार असाल तर तुम्हाला आधी ही बातमी वाचणे आवश्यक आहे. सोन्याच्या दरात काल हजार रूपयांनी वाढ (Gold Price Hike) झाली होती आजही सोन्याच्या दरात वाढ झालेली पाहायला मिळते आहे. त्यामुळे येत्या गुढीपाडव्याला अन् लग्नसराईच्या (Gudi Padwa 2023) ऐन मौसमात सोन्याचे भाव वधारलेले पाहायला मिळतील. काल सोन्याच्या भावांनी 60 हजार रूपयांचा टप्पा पार केला होता आता सोन्याच्या दरात पुन्हा एकदा वाढ झालेली पाहायला मिळत आहे. त्यामुळे ग्राहकांना आता अधिकीचे पैसे मोजावे लागणार आहेत. तेव्हा जाणून घेऊया की तुमच्या शहरात नक्की सोन्याचे भाव किती आहेत? (gold price today know the gold price rates in your city on the occasion of gudi padwa and wedding season)

समोर आलेल्या माहितीनुसार, सोन्याचे भाव कालच्या सारखे पुन्हा वधारले आहेत. कालपर्यंत 24 कॅरेट सोनं हे 60,320 रूपये प्रति 10 ग्रॅम इतकं होते. आज याच सोन्याची किंमत ही वाढून 61,276 रूपये प्रति 10 ग्रॅम इतकी झाली आहे. तेव्हा आता लग्नसराईच्या मौसमात ग्राहकांना अधिकीचे पैसे मोजावे लागणार आहेत. शुद्ध प्रतिच्या सोन्याच्या किमतींमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होताना गेल्या काही दिवसांतून दिसते आहे. गोल्ड प्राईस फोरकास्टिंगनुसारही या मार्च महिन्यात सोन्याचे दर हे गगनाला भिडन्याची शक्यता आहे. 

तुमच्या शहरातील दर काय आहेत वाचा - 

  • चेन्नई - 63,149 रूपये प्रति 10 ग्रॅम 
  • बंगलोर - 63,137 रूपये प्रति 10 ग्रॅम 
  • पुणे - 61, 276 रूपये प्रति 10 ग्रॅम 
  • दिल्ली - 63, 149 रूपये प्रति 10 ग्रॅम

मिस्ड कॉल देऊन किंमत जाणून घ्या

22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोने दागिन्यांचा किरकोळ दर जाणून घेण्यासाठी तुम्ही 8955664433 वर मिस कॉल करू शकता. त्यानंतर लगेचच एसएमएसद्वारे दर प्राप्त होतील. 

अशा प्रकारे सोन्याची शुद्धता जाणून घ्या

आता सोन्याची शुद्धता तपासायची असेल, तर त्यासाठी सरकारने एक अॅप बनवले आहे. बीआयएस केअर अॅपद्वारे ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या अॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धता तपासू शकत नाही, तर त्याच्याशी संबंधित कोणतीही तक्रारही करू शकता.