Gold Rate Today: अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर सोन्याचे दर घसरले, ग्राहकांसाठी सुवर्णसंधी

Gold Sliver Price Today: सोन्याचे दर आजही 60 हजार रूपयांच्या पार (Gold Rate Hike) गेलेले दिसत आहेत. त्यामुळे यावेळीही अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर (Akshya Trutiya 2023) आपल्याला सोन खरेदी करायची चांगली संधी प्राप्त झाली आहे. आज 20 एप्रिलला सोन्याचे दर (Gold Price Today) हे घसरलेले दिसत आहेत. 

Updated: Apr 20, 2023, 12:07 PM IST
Gold Rate Today: अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर सोन्याचे दर घसरले, ग्राहकांसाठी सुवर्णसंधी title=

Gold Sliver Price Today 20th April 2023: गेल्या काही दिवसांपासून सोन्याचे भाव (Gold Rate Today) हे खाली घसरताना दिसत आहेत. आज 20 एप्रिल रोजीही हे भाव घसरल्याचे दिसले. त्यामुळे सोनं खरेदी करण्यांसाठी ही एक उत्तम संधी आहे. या एप्रिल महिन्यापासून सोन्याच्या दरात बऱ्यापैंकी घसरण दिसत आहे. त्यामुळे सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी आता चांगली संधी (Gold News) प्राप्त झाली आहे. आज 24 कॅरेट सोन्याचे दर हे 60,930 रूपये प्रति 10 ग्रॅम इतके आहेत. काल ही किंमत 61,150 रूपयांवर गेली होती. त्याआधी म्हणजे 18 एप्रिलला हीच किंमत 60,920 रूपये प्रति 10 ग्रॅम इतकी होती. त्यामुळे अद्यापही सोनं हे 60 हजारांच्या खाली आलेलं नाही. 

24 कॅरेट सोन्याचे दर हे सध्या घसरताना दिसत आहेत. आज मुंबईत 1 ग्रॅम सोन्यापासून ते 100 ग्रॅम सोन्याचे दर हे घसरल्याचे दिसत आहेत. गुडरिटर्न्सनुसार, 1 ग्रॅम सोनं हे आज 6,093 रूपये आहे तर काल ही किंमत 6,115 रूपयांपर्यंत गेली आहे. कालच्या आणि आजच्या किंमतीमध्ये 22 रूपयांची घट आहे. तर 10 ग्रॅमच्या सोन्याच्या दरात 220 रूपयांची घट झाली आहे. आज ही किंमत 60,930 रूपये इतकी होती तर काल हीच किंमत ही 61,150 रूपये इतकी आहे. (Gold Price Today shrinks by 220 rupees in 10 gram gold 24 carat gold price came down)

काय आहेत सोन्याचे भाव? 

22 कॅरेटच्या सोन्याच्या दरांमध्येही घट झाली आहे. आज 1 ग्रॅम सोन्याचे दर हे 5,585 रूपये इतके होते तर काल हे दर 5,605 रूपये इतके होते. यामध्ये 20 रूपयांची घट झाली आहे. तर 10 ग्रॅम सोन्याच्या किमतीतही 200 रूपयांची घट झाली आहे. 56,050 रूपये सोन्याचे कालचे दर होते तर आज सोन्याचे दर (Gold Price for 10 Gram) 55,850 रूपये इतके होते.  

काय आहेत ग्लोबल संकेत? 

MCX वरही सोन्याचे दर घसरताना दिसत आहेत. त्यामुळे येथे ग्राहकांसाठी चांगली संधी प्राप्त झाली आहे. एमसीएक्सवर सोनं 222 रूपयांनी खाली आलं आहे. आज MCX वर सोनं हे 75,250 रूपये प्रति किलोग्रॅमच्या भावावर ट्रेण्ड होत आहे.  सध्या मोठ्या प्रमाणात आंतरराष्ट्रीय स्तरावर गुरूवारी (Global Gold Rates) सोनं घसरल्याचे संकेत दिसले आहेत. सोनं हे 0.1 टक्क्यांनी घसरल्याचे दिसते आहे. 1,992.23 डॉलर पर आऊन्स म्हणजे 0332 जिएमटी असा आहे. हा भाव 2,004.00 आऊन्सनं घटू शकतो. त्यामुळे आता ग्राहकांना चांगली संधी प्राप्त झाल्याचे कळते आहे.