Wedding Bells : 14 वर्षांनी मोठ्या अभिनेत्याशी लग्न करणार शिवांगी जोशी!

Is Shivangi Joshi Getting Married to Kushal Tandon : शिवांगी जोशी वयानं 14 वर्ष मोठा असलेल्या अभिनेत्याशी करणार लग्न! 

दिक्षा पाटील | Updated: May 3, 2024, 11:26 AM IST
Wedding Bells : 14 वर्षांनी मोठ्या अभिनेत्याशी लग्न करणार शिवांगी जोशी! title=
(Photo Credit : Social Media)

Is Shivangi Joshi Getting Married to Kushal Tandon : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री शिवांगी जोशी आणि कुशल टंडन या दोघांनी बरसातें- मौसम प्यार का या मालिकेत काम केलं आहे. दोघांची जोडी प्रेक्षकांना प्रचंड आवडली. मालिकेतील त्यांची केमिस्ट्री पाहून त्यांच्या चाहत्यांना अनेकदा वाटलं की ते दोघं रिलेशनशिपमध्ये आहेत. दरम्यान, यावर शिवांगी किंवा कुशलनं कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. पण आता अशी माहिती समोर आली आहे की त्या दोघांच्या चाहत्यांना प्रचंड आनंद झाला आहे. असं म्हटलं जातं की दोघांनाही त्यांच्या नात्यावर शिक्का मोर्तब करायचा आहे. 

'न्यूज 18' नं दिलेल्या रिपोर्टनुसार, शिवांगी जोशी आणि कुशल टंडन या दोघांना या मालिके दरम्यान एकमेकांवर प्रेम झाले. ते दोघे सध्या सीरियस रिलेशनशिपमध्ये आहे आणि आता त्याच्या नात्याला पुढे घेऊन जाण्याच्या विचारात आहेत. असं म्हटलं जातं की शिवांनी आणि कुशल लवकरच लग्न बंधनात अडकण्याचा विचार करत आहेत. दोघांनी आतापर्यंत त्यांच्या नात्याविषयी अजून यासाठी लपवलं कारण त्यांना त्यांचं खासगी आयुष्य हे खासगीच ठेवायचं होतं. त्यांना त्यांच्या नात्याची घोषणा ही योग्यवेळी करायची होती. या बातमीवर शिवांगी किंवा कुशालनं दुजोरा दिलेला नाही. त्यामुळे आता या बातमीत किती सत्य आहे आणि किती अफवाह आहे याविषयी ते दोघेच सांगू शकतात. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

शिवांगी आणि कुशल यांच्यात वयाचा खूप फरक आहे. कुशल हा शिवांगीपेक्षा वयानं 14 वर्षांनी मोठा आहे. तर कुशलच्या पास्ट रिलेशनशिपविषयी बोलायचे झाले तर तो आधी गौहर खानसोबत रिलेशनशिपमध्ये होता. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

हेही वाचा : 44 वा वाढदिवसावेळी धर्मेंद्र यांचा रोमँटिक अंदाज... आई- वडिलांच्या नात्यातील खास दिवशी मुलं गैरहजर

दरम्यान, शिवांगी विषयी बोलायचे झाले तर तिचं नाव आधी बालिका वधू 2 चा को-स्टार रणदीप रायशी जोडण्यात आलं होतं. दरम्यान, 2022 मध्ये शिवांगीनं या अफवाह असल्याचे स्पष्ट केलं आणि म्हटलं की आम्ही फक्त चांगले मित्र आहोत. शिवांगीला खरी लोकप्रियता ही ये रिश्ता क्या कहलाता है या मालिकेतून मिळाली. त्या मालिकेत शिवांगीनं नायरा ही भूमिका साकारली होती. त्या मालिकेत शिवांगी आणि मोहसिन खान यांची जोडी पाहायला मिळाली होती. त्या दोघांच्या रिलेशनशिपच्या देखील चर्चा सुरु झाल्या होत्या. पण काही काळानंतर त्या दोघांचा ब्रेकअप झाल्याचे म्हटले जाऊ लागले.