Gold Price Today : घाई करु नका! ऐन लग्नसराईत 'इतक्या' रुपयांनी सोने महाग; तर चांदी...,जाणून घ्या आजचे दर

Gold-Silver Price : सध्या लग्नसराईचा काळ सुरू होत आहे. अशातच या लग्नसराईत लोक मोठ्या प्रमाणात सोने खरेदी करतात मात्र आता या लग्नसराईत ग्राहकांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण सोन्याच्या किमतीत आजही वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. 

श्वेता चव्हाण | Updated: Apr 12, 2023, 09:46 AM IST
Gold Price Today : घाई करु नका! ऐन लग्नसराईत 'इतक्या' रुपयांनी सोने महाग; तर चांदी...,जाणून घ्या आजचे दर  title=
Gold prices in India see increase today

Gold-Silver Price on 12 April 2023 :  ऐन लग्नसराईच्या दिवसात सोन्याच्या (gold rate) किमतींनी साठी गाठल्यामुळे सामान्य नागरिकांना मोठा फटका बसला आहे. सोन्याची वाढते दर पाहता अनेकांनी सोने खरेदी थांबवल आहे. याचा फटका देखील आता मार्केटमध्ये अनेकांना बसत आहे. परिणामी 22 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत आज 55,700 रुपये आहे. तर चांदी 76,600 रुपये प्रति किलो दराने विकली जात आहे. यामध्ये उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग चार्जेसमुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती संपूर्ण भारतात बदलतात. त्यामुळे सोने खरेदी करताना जास्त घाई करु नका...   

सोन्याचे दर गेल्या अनेक महिन्यांपासून वाढत चालले आहे.  यावेळी सोन्याने नवीन विक्रम केला आहे. 5 एप्रिलला सार्वाधिक सोन्याचे दर बघायला मिळाले आहेत. त्यामुळे जगातील मार्केटमध्ये अस्थिरता निर्माण झाली आहे. आज जाहिर झालेल्या सोन्या दरात किंचित वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबईत (mumbai gold rate) 22 कॅरेट सोन्याचा प्रति 10 ग्रॅमचा भाव 55,700 रुपये आहे.

वाचा : गाडीत पेट्रोल-डिझेल भरण्यापूर्वी जाणून घ्या तुमच्या शहरातील दर 

तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 60,760 प्रति 10 ग्रॅम आहे. पुण्यात 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅम दर 55,700 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 60,760 रुपये असेल. नागपुरात 22 कॅरेट सोन्याचा प्रति 10 ग्रॅमचा दर 55,700 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 60,760 रुपये आहे. नाशिकमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 55,730 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 10 ग्रॅमचा दर 60,760 रुपये आहे. तर चांदी आज प्रति 10 ग्रॅमनुसार 766 रुपयांनी विकली जाणार आहे. 

मिस्ड कॉल देऊन किंमत जाणून घ्या

22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोने दागिन्यांचा किरकोळ दर जाणून घेण्यासाठी तुम्ही 8955664433 वर मिस कॉल करू शकता. त्यानंतर लगेचच एसएमएसद्वारे दर प्राप्त होतील. 

अशा प्रकारे सोन्याची शुद्धता जाणून घ्या

आता सोन्याची शुद्धता तपासायची असेल, तर त्यासाठी सरकारने एक अॅप बनवले आहे. बीआयएस केअर अॅपद्वारे ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या अॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धता तपासू शकत नाही, तर त्याच्याशी संबंधित कोणतीही तक्रारही करू शकता.