लग्नसराईत सोन्याच्या दरात वाढ, तर चांदी स्थिर

आंतरराष्ट्रीय बाजारात होत असलेल्या चढ-उतारामुळे आणि लग्नसाईत वाढलेल्या मागणीमुळे सोन्याच्या किमतीत वाढ झाल्याचं पहायला मिळत आहे.

Sunil Desale Sunil Desale | Updated: Jan 21, 2018, 02:24 PM IST
लग्नसराईत सोन्याच्या दरात वाढ, तर चांदी स्थिर title=
File Photo

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय बाजारात होत असलेल्या चढ-उतारामुळे आणि लग्नसाईत वाढलेल्या मागणीमुळे सोन्याच्या किमतीत वाढ झाल्याचं पहायला मिळत आहे.

सोन्याच्या किमतीत पुन्हा वाढ

दिल्लीतील सरफा बाजारात गेल्या आठवड्यात सोन्याच्या किमतीत पुन्हा एकदा वाढ झाल्याचं दिसलं.

... म्हणून सोन्याच्या किमतीत वाढ

स्थानिक बाजारांत ज्वेलर्सकडून होणारी मागणी यामुळे सोन्याच्या किंमतीत वाढ झाली आहे.

पाहा किती आहे प्रति तोळा दर

दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याच्या किंमतीत १०० रुपयांनी वाढ झाल्याचं पहायला मिळालं. त्यामुळे आता १० ग्रॅम सोन्याचा दर ३०,८५० रुपयांवर पोहोचला आहे.

एकीकडे सोन्याच्या दरात वाढ झाली असताना चांदीचा दर आठवड्याच्या शेवटी स्थिर राहील्याचं पहायला मिळालं. त्यामुळे चांदीचा दर ३९,९०० रुपये प्रति किलोग्रॅमवर पोहोचला आहे.

आंतरराष्ट्रीय स्तरावर न्यूयॉर्कमध्ये सोन्याच्या दरात घट होत ते १,३३०.६० डॉलर प्रति औंसवर पोहोचले. तर, चांदीच्या दरातही घट होत १७.०९ डॉलर प्रति औंसवर पोहोचला आहे.

राजधानी दिल्लीमध्ये ९९.९ टक्के आणि ९९.५ टक्के शुद्धता असलेल्या सोन्याचा दर क्रमश: ३१,१०० रुपये आणि ३०,९५० रुपये प्रति दहा ग्रॅम झाला आहे.