Gold Rate Today: सोन्याच्या किंमतीत मोठी घसरण

दुसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात मोठी घसरण...

Updated: Jul 20, 2021, 12:29 PM IST
Gold Rate Today: सोन्याच्या किंमतीत मोठी घसरण  title=

मुंबई : सोन्याच्या किंमतीत आज मोठी घसरण नोंदविण्यात आली आहे. 100 ग्रॉम सोन्याचे दर 1 हजार 500 रूपयांना कमी झाले आहेत. तर 10 ग्रॉम सोन्याचे दर 150 कमी झाले आहेत. त्यानुळे 10 ग्रॉम सोन्याचेदर जवळपास 47 हजार रूपयांवर आहेत. ही माहिती गोल्ड रिटर्न वेबसाईटने दिली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची किंमत वाढली आहे. गेल्या काही दिवसांपासून सोन्याचे दर अस्थिर आहेत. तरी देखील सोन्याची मागणी कमी झालेली नाही. लग्न सराई आणि सण जवळ आल्यामुळे सोने धातूच्या मागणीत वाढ झाली आहे. 

तुमच्या शहरातील सोन्याचे दर 
शहर                 22 कॅरेट                        24 कॅरेट
मुंबई               47 हजार 40                 48 हजार 40
दिल्ली             47 हजार 150              51 हजार 440
चेन्नई               45 हजार 460              49 हजार 560
कोलकाता        47 हजार 600             49 हजार 909

तज्ज्ञांच्या मतानुसार 2021 वर्षाअखेर  सोन्याचे दर 60 हजार रूपयांचा आकडा पार करू शकतात. म्हणजे जर तुम्ही सहा महिन्यांमध्ये सोने  या मैल्यवान धातूत पैसे गुंतवल्यास फायदा नक्कीचं होईल. येत्या काळात सोन्याचे तर गेल्या वर्षीचा रेकॉर्ड मोडू शकतात. सोन्याच्या गुंतवणुकीबद्दल सांगायचं झालं तर गेल्या वर्षी सोन्याने 28 टक्के रिटर्न्स दिलं.