Good News, केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ

दिवाळीच्या तोंडावर केंद्रीय कर्माचाऱ्यांसाठी खूशखबर आहे.  

Updated: Oct 9, 2019, 03:19 PM IST
Good News, केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ title=

नवी दिल्ली : दिवाळीच्या तोंडावर केंद्रीय कर्माचाऱ्यांसाठी खूशखबर आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात पाच टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आता महागाई भत्ता १७ टक्के होणार आहे. जवळपास ५० लाख कर्मचाऱ्यांना याचा लाभ होणार आहे. दरम्यान, महाराष्ट्र आणि हरियाणा या दोन राज्यातल्या निवणुका सुरू असताना ही घोषणा करण्यात आली आहे.

केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी महागाई भत्त्यात वाढ करण्यात येत असल्याची घोषणा आज केली. नव्या निर्णयामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांचा भत्ता आता १२ टक्क्यांवरून थेट १७ टक्के झाला आहे. वाढीव भत्ता जुलै २०१९ पर्यंत कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. या निर्णयामुळे केंद्र सरकारच्या तिजोरीवर १६ हजार कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा पडणार आहे.

केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ५ टक्क्यांची वाढ करण्याच्या प्रस्तावास आज मान्यता देण्यात आली. सरकारच्या या निर्णयाचा फायदा ५० लाख कर्मचारी व ६५ लाख निवृत्तीवेतन धारकांना मिळणार आहे.