रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी! आता या 44 गाड्यांमध्ये आरक्षणाशिवाय करू शकाल प्रवास

Indian Railways, IRCTC : कोरोना विषाणूची दुसरी लाट ओसरत आहे. त्यामुळे आता अनेक रेल्वे गाड्या रुळावर येऊ लागल्या आहेत. 

Updated: Jul 12, 2021, 09:24 AM IST
रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी! आता या 44 गाड्यांमध्ये आरक्षणाशिवाय करू शकाल प्रवास title=

मुंबई : Indian Railways, IRCTC : कोरोना विषाणूची दुसरी लाट ओसरत आहे. त्यामुळे आता अनेक रेल्वे गाड्या रुळावर येऊ लागल्या आहेत. उत्तर पश्चिम रेल्वे नियमित गाड्याऐवजी विशेष गाड्या सोडण्यावर भर देत आहे. नवीन गाड्या चालवण्यात येत आहे. कारण गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सर्वसाधारण तिकिट घेऊन प्रवास करण्यासही बंदी आहे. मात्र, या नियमात आता शिथिलता आणण्यात येत आहे. आता 44 गाड्यांमध्ये आरक्षणाशिवाय प्रवास करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. 

आरक्षणाशिवाय प्रवास करू शकतो

रेल्वेने प्रवाशांना आरक्षणाशिवाय बऱ्याच रेल्वेमध्ये प्रवास करण्याची परवानगी दिली आहे. जयपूर, जोधपूर, अजमेर आणि बिकानेर विभागातील 44 प्रवासी आणि डीएमयू गाड्यांमध्ये रेल्वेने सर्वसाधारण तिकिटातून प्रवास करण्यास परवानगी दिली आहे. या 44 गाड्यांपैकी जयपूरसाठी 7 गाड्या आहेत. दरम्यान, उत्तर-पश्चिम रेल्वेमध्ये जवळपास 80 टक्के गाड्यांची ऑपरेटिंग सुरू झाली आहे.

कोरोना विषाणूच्या संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी रेल्वेने गर्दी नियंत्रणासाठी सामान्य प्रवासाबरोबरच आरक्षण तिकिटांवरही बंदी घातली होती. यासह, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्यावेळी अनेक स्थानके देखील पूर्णपणे बंद असल्याचे दिसून आले. तथापि, बऱ्याच दिवसानंतर एकदा गाड्यांचा वेग वाढला आहे.

 72 गणपती स्पेशल ट्रेन 

दरम्यान, मध्य रेल्वेने कोकणात गणपती उत्सवाला जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी 72 गणपती स्पेशल ट्रेन सोडल्या आहेत.  संपूर्ण आरक्षित असलेल्या या गाड्यांचे बुकिंग गुरुवार 8 जुलैपासून सुरु झाले आहे. काही गाड्या फुल्ल झाल्या आहेत.  या रेल्वे सीएसएमटी-पनवेल आणि सावंतवाडी रोड, रत्नागिरीदरम्यान चालविण्यात येणार आहेत. या रेल्वे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 'सोशल डिस्टन्सिंग'चे सर्व नियम पाळून चालविण्यात येणार आहेत.

अनेक ठिकाणी गाड्या रद्द

त्याचबरोबर बिहारमधील पुरामुळे अनेक ठिकाणी गाड्यांचे कामकाज ठप्प झाले आहे. समस्तीपूर दरभंगा रेल्वे विभागाच्या डाऊन मार्गावरील गाड्यांचे कामकाज 10 जुलैपासून थांबविण्यात आले आहे, तर विभागातील सागौली नरकटियागंज रेल्वे विभागात सात दिवसांपासून गाड्यांचे परिचालन थांबविण्यात आले आहे. अपघातामुळे तसेच पुरामुळे होणारे नुकसान लक्षात घेता या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. काही प्रवाशांच्या मेल एक्स्प्रेस गाड्या वळविण्यात आल्या आहेत जेणेकरून प्रवाशांना ये-जा करण्यात थोडी सहजता येईल.