TikTok आणि Heloला आणखी एक झटका

गुगल, ऍपलनंही घेतला मोठा निर्णय   

Updated: Jun 30, 2020, 11:56 AM IST
TikTok आणि Heloला आणखी एक झटका  title=
संग्रहित छायाचित्र

मुंबई : TikTok आणि Helo या अतिशय लोकप्रिय आणि मोठ्या प्रमाणावर वापरात असणाऱ्या ऍपसह इतरही चिनी बनावटीच्या ऍपवर भारतात बंदी आणण्याचे आदेश केंद्राकडून देण्यात आले. तसा निर्णय घेत या ऍपला झटकाच देण्यात आला. त्यामागोमागच आता Google आणि Appleनंही या ऍपना झटका दिला आहे. 

जगभरात अतिशय नावाजलेल्या या ऍपना Google आणि Appleनं त्यांच्या ऍप स्टोअरवरुन हटवलं आहे. सोमवारी रात्री केंद्राकडून ५९ ऍपवरील बंदीचा निर्णय घेतल्यानंतर मंगळवारी तातडीनं Google आणि Appleनं हा निर्णय घेतल्याचं कळत आहे. त्यामुळं आता कोणाही भारतीय युजरला हे ऍप डाऊनलोड करता येणार नाहीत. 

सध्या हाती येणाऱ्या माहितीनुसार गुगलकडून प्ले स्टोअरवरुन आणि आणि ऍपल कडून ऍपल स्टोअरवरुन काही चिनी ऍपवर बंदी आणण्यात आली आहे. पण, केंद्राकडून नमूद करण्यात आलेले काही ऍप मात्र अद्यापही ऍप स्टोअरवर दिसत आहेत. असं असलं तरीही ऍपल किंवा गुगल यांपैकी कोणीही याबाबतची अधिकृत माहिती मात्र प्रसिद्ध केलेली नाही. 

भारताकडून बंदी आणताच TikTok म्हणतं...

 

टिक टॉकची सारवासारव

भारतात मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय असणाऱ्या आणि असंख्य युजर असणाऱ्या टिक टॉक या ऍपवरही कारवाईचा बडगा येताच टिक टॉक इंडियाकडून एका जाहिर निवेदनातून स्पष्टीकरण देण्यात आलं. वापरकर्त्यांची गोपनीयता आणि अखंडता आपल्याला प्राधान्यस्थानी असून, आतापर्यंत कोणच्याही युजरची माहिती ही परदेशी सरकारला किंवा चिनी सरकारला देण्यात आली नसल्याचं या निवेदनात म्हटलं गेलं होतं.