विमान प्रवास महागणार, 1 जूनपासून वाढणार तिकिटाचे दर

प्रवाशांवर पडणार दरवाढीचा ताण 

Updated: May 29, 2021, 07:07 AM IST
विमान प्रवास महागणार, 1 जूनपासून वाढणार तिकिटाचे दर  title=

मुंबई : सरकारने घरगुती विमान प्रवासात दरवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. एविएशन मंत्रालयाने घरगुती विमान प्रवासाच्या तिकिटात 15 टक्के वाढ केली आहे. हा निर्णय 1 जूनपासून लागू होणार आहे. कोरोनाची दुसरी लाट संपूर्ण देशभरात पसरली आहे. असं असताना विमान मंत्रालयाने विमान प्रवासात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. 

नागरीक उड्डाण मंत्र्यांनी प्रवासात दरवाढ करण्यास दिली मंजुरी 

कोरोनाने पुन्हा डोके वर केले आहे. देशभरात कोरोनाची दुसरी लाट पसरली आहे. अशा परिस्थितीत विमान प्रवासावर नियंत्रण आलं आहे. असं असताना नागरीक उड्डाण मंत्रालयाने एअरलाइन्सच्या नेटवर्क कॅपेसिटीतही कपात केली आहे. अशा परिस्थितीत आता 1 जूनपासून दरवाढ होणार आहे. 

हा बदल कमीत कमी विमान प्रवासावर केला आहे. डोमेस्टिक विमान प्रवास 'ए' ते 'जी' पर्यंत अशा सात श्रेणी असतात. या सातही श्रेणीत विमान प्रवास वाढला आहे. मिळालेल्या विमान प्रवासात 'ए' श्रेणीत कमीत कमी 2600 रुपये ते सर्वाधिक 7800 रुपये वाढणार आहे.

तेथेच 'जी' श्रेणीत कमीत कमी 8700 रुपये आणि सर्वाधिक 24,200 रुपये एवढा विमान प्रवास होणार आहे. विमान प्रवासात हा बदल 1 जूनपासून होणार आहे. 

एअरलाईन कंपन्यांना मिळणार मदत 

सरकारच्या या निर्णयाने एअरलाइन्स कंपन्यांना मोठी मदत मिळणार आहे. कोविड-19 च्या दुसऱ्या लाटेत विमान प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या संख्येने कमी झाली आहे. यामुळे त्यांच्या उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. 

नागरिक उड्डाण मंत्रालयाने शुक्रवारी जाहीर केलेल्या आदेशानुसार, 40 मिनिटांच्या विमान प्रवासाकरता कमीत कमी 2,300 रुपये आणि सर्वाधिक 2,600 रुपये आकारले जाणार आहे. या प्रवासात 13 टक्के वाढ केली आहे. 

तसेच 40 ते 60 मिनिटांच्या प्रवासात कमीत कमी 2,900 रुपये आणि सर्वाधिक 3,300 रुपये विमान प्रवास एका व्यक्तीचा असणार आहे. 

प्रवाशांची संख्या झपाट्याने घटली 

एप्रिल 2021 मध्ये डोमेस्टिक विमानाने प्रवास करणाऱ्यांची संख्या ही मार्च 2021 च्या तुलनेत कमी होती. भारतीय विमानन डायरेक्टर जनरल ऑफ सिविल एविशन यांनी दिलेल्या माहितीनुसार, एप्रिलमध्ये 57.25 लाख लोकांचा डोमेस्टिक विमान प्रवास केला. हा प्रवास मार्च महिन्याच्या तुलनेत 26.8 टक्क्याने कमी होता.