एअर इंडियाचा ७६ टक्के हिस्सा विकणार सरकार, ९ महिन्यांपासून सुरू होती तयारी

सरकारने अर्नेस्ट अॅण्ड यंगला ट्रांजेक्शनन्स सल्लागार म्हणून नियूक्त करण्यात आले आहे. सरकार एअर इंडियाचा ७६ टक्के हिस्सा विकणार आहे.

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Mar 28, 2018, 08:22 PM IST
एअर इंडियाचा ७६ टक्के हिस्सा विकणार सरकार, ९ महिन्यांपासून सुरू होती तयारी title=

नवी दिल्ली: आर्थीक गर्तेत अडकलेल्या एअर इंडियाला सावरण्यासाठी सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने म्हटले आहे की, एअर इंडियात निर्गुंतवणूक करण्यासाठी बोली लावली जाईल. यासाठी सरकारने अर्नेस्ट अॅण्ड यंगला ट्रांजेक्शनन्स सल्लागार म्हणून नियूक्त करण्यात आले आहे. सरकार एअर इंडियाचा ७६ टक्के हिस्सा विकणार आहे.

खरेदीदारासाठी २८ मे पर्यंतचा वेळ

गेल्या वर्षी जूनमध्ये या विचाराला औपचारीक मान्यता मिळाल्यावर सरकार हा विचार निर्णयात परावर्तीत करण्यासाठी प्रयत्न करत होती. या लिलावात एअर इंडियाची सब्सिडरी AISA आणि AIXL च्या ५० टक्के भागिदारीचाही समावेश असेन. या लिलावात सहभागी होण्यासाठी इच्छुक बल्डर्ससाठी २८ मे पर्यंतचा वेळ देण्यात आला आहे.  एअर इंडियाची धोरणात्मक निर्गुंतवणूक उच्च व्यवस्थापनाच्या हस्तांतरणाद्वारे केली जाईल. याशिवाय भारत सरकारच्या हिश्श्यातील ७६ टक्के इक्विटी शेअर विकले जातील.

एअर इंडियात निर्गुंतवणूक करण्यासाठी यापूर्वीच सरकारी मान्यता

दरम्यान, केंद्र सरकारने एअर इंडियात निर्गुंतवणूक करण्यासाठी यापूर्वीच मान्यता दिली आहे. त्यानंतर एअर इंडिया विकली जाण्याची जोरदार चर्चा सुरू होती. तसेच, याआधी सरकारने जानेवारी महिन्यात विमान कंपनी एअर इंडियात एफडीआयला मंजूरी देण्यात आल्यावर एअर इंडियाला विकण्याची योजना तयार केली होती. या योजनेच्या मसूद्यात ४ भागांमध्ये कंपनीला विभाण्यात यावा असा प्रस्ताव होता.