चेहरा ओळखून महिलेचं प्रेत जाळलं, तरी दुसऱ्या दिवशी महिला घरी चालत आली

घरातील व्यक्ती दगावल्या आहेत, याचं दु:ख त्या कुटूंबाला कायम सतावत असतं. पण ती व्यक्ती अचानक 

Updated: Jun 3, 2021, 09:13 PM IST
चेहरा ओळखून महिलेचं प्रेत जाळलं, तरी दुसऱ्या दिवशी महिला घरी चालत आली title=

हैदराबाद : कोरोनामुळे अनेकांच्या घरातील व्यक्ती दगावल्या आहेत, याचं दु:ख त्या कुटूंबाला कायम सतावत असतं. पण ती व्यक्ती अचानक जिवंत होवून घराकडे परतली तर...किती आनंद होईल ना? असंच काहीसं इथं घडलंय. असं काही घडतं का असा विचार करण्याआधी आम्ही तुम्हाला सांगत आहोत ही एक सत्यकथा आहे आणि ही कशी घडली. हे सगळं सिनेमात खरं होतं, आयुष्य म्हणजे काही सिनेमा नाही. त्यामुळे असे होणार नाही. परंतु आम्ही जी घटना तुम्हाला सांगणार आहोत, ती एक सत्यकथा आहे.

ही घटना आंध्र प्रदेशमधील कृष्णा जिल्ह्यातील जग्गॅयापेठ कस्बा म्हणजे गावातील आहे. इथे एक 75 वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला, म्हणून आजीच्या नवऱ्याने तिचा अंत्यविधी केला. परंतु ती वृद्ध आजी काही दिवसांनी आपल्या घरी चालत आली. हे पाहिल्यावर तिच्या नवऱ्याला आणि घरच्यांना धक्का बसला आणि आनंद झाला....पण ते विचारात पडले हे असं कसं झालं?

वारलेली आजी अंत्यसंस्कारानंतर जिवंत कशी परतली?

गिरिजाम्मा नावाच्या या आजीला 12 मे ला कोरोनाची लागण झाली होती. यामुळे तिला विजयवाड़ाच्या एका सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर 15 मे रोजी जेव्हा या आजीचे पती तिला रुग्णालयात पाहायला गेले तेव्हा त्यांना आजी भेटली नाही. 

ते रुग्णालयात चौकशी करायला गेले तेव्हा समजले की, आजीला दुसऱ्या वॉर्डमध्ये नेले आहे. त्यांनतर आजीच्या नवऱ्याने रुग्णालयातील सगळे वॉर्ड शोधले, परंतु त्यांना आजी दिसली नाही.

खूप शोध घेतल्यानंतर एक शेवटचा उपाय म्हणून रुग्णालयाने शवगृहात एकदा खात्री करण्यासाठी सांगितले. त्यांनंतर आजोबांना शवगृहात गिरिजाम्मा आजीचा मृतदेह दिसला. त्यानंतर आजीचे मृत्यूपत्र बनवण्यात आले.

आजोबांनी नंतर आजीच्या मृतदेहाला घरी आणले. त्याच दिवशी आजोबांच्या नातवाचा ही कोरोनाने मृत्यू झाला होता. त्यामुळे त्यांच्य़ा घरातल्यांनी दोघांचाही अंत्यविधी एकाच वेळी केला आणि घरी परतले.

मात्र खरा धक्का सर्वांना तेव्हा बसला

मात्र खरा धक्का सर्वांना तेव्हा बसला, जेव्हा ही गिरिजाम्मा आजी, चालत थेट घराच्या दारापर्यंत पोहोचली. सुरुवातीला काय झालं हे सर्वांना कळलं नाही. पण आजी जिवंत आहे हे पाहून सर्वांना आनंद झाला, आजीलाही नवऱ्याला पाहून आनंद झाला.

पण मग आजीच्या नवऱ्याने ज्या महिलेवर अंत्यसंस्कार केले ती महिला कोण होती. आजीच्या नवऱ्याने तर आजीला पाहून शवागारातून मृतदेह उचलला होता. पण नंतर असं समोर आलं की घाई-घाईत, आजीसारखा चेहरा असणाऱ्या महिलेचा मृतदेह तिचा नवरा अंत्यसंस्काराला घेऊन आला. तिच्यावर अंत्यसंस्कारही केले.

असं कसं घडू शकतं?

मात्र याच वेळी त्यांची बायको गिरिजाम्मा ही कोव्हीड सेंटरमध्येच उपचार घेत होती, ती बरीही झाली, तरी तिला घ्यायला कुणीच येत नव्हतं, तिची तेथून सुटकाही झाली तरी देखील, कुणीच घ्यायला आलं नाही, म्हणून आजी घरी चालत पोहोचली, दारावर आली तेव्हा सर्वांना आनंद झाला, मात्र ज्या अनोळखी महिलेच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार झाले, ती अजूनही तिच्या कुटूंबियांसाठी बेपत्ताच असेल.