Sonbhadra : अखेर 'त्या' सोन्याच्या खाणीविषयीची खरी माहिती उघड

सोनभद्र हे नाव गेल्या काही दिवसांपासून बरंच चर्चेच आलं आहे

Updated: Feb 23, 2020, 07:53 AM IST
Sonbhadra : अखेर 'त्या' सोन्याच्या खाणीविषयीची खरी माहिती उघड  title=
Sonbhadra : अखेर 'त्या' सोन्याच्या खाणीविषयीची खरी माहिती उघड

नवी दिल्ली : काही दिवसांपासून चर्चेत असणाऱ्या सोनभद्र Sonbhadra या ठिकाणच्या सोन्याच्या खाणीविषयी एक अतिशय महत्त्वाची माहिती समोर आली आहे. शनिवारी उत्तर प्रदेशमधील. हरदी डोंगर भागात जवळपास ३ हजार टनांहून जास्त प्रमाणात सोनं असल्याचा दावा भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण, म्हणजेच GSI जीएसआयने फेटाळला आहे. 

माध्यमांकडून या भागात ३ हजार ३५० टन इतकं सोनं असल्याचा दावा करण्यात येत आहे. पण, हे सत्य नाही. या भागात फक्त १६० किलो सोनं असल्याची माहिती त्यांच्याकडून देण्यात आली. जीएसआयकडून अधिकृत परिपत्रक काढत याविषयीची माहिती देण्यात आली. 

जीएसआय अध्यक्ष डॉ.जीएस तिवारी यांच्या माहितीनुसार सोनभद्रच्या खाणीत ३ हजार टनहून अधिक सोनं असल्याचा दावा फेटाळण्यात येत आहे. सोनभद्रमध्ये मिळालेल्या एकूण सोन्याचं प्रमाण पाहता यातून प्रती टन ३.०३ ग्रॅम सोनं निघणार आहे. याचा हिशोब केला असता एकूण सोन्याचं प्रमाण १६० किलो सोनं मिळणार आहे. 

Image

सोनभद्रमध्ये अद्यापही सोन्याचा शोध सुरु आहे. याविषयी जीएसआयचा सर्व्हेही सुरु आहे. या ठिकाणी सोनं असण्याची शक्यता नाकारली जात नाही. याच धर्तीवर GSIकडून एक अहवाल भूतत्व खनिजकाम निदेशालयकडे पाठवण्यात आला आहे. याचविषयी आता पुढीत तपासही सुरु आहे. तेव्हा आता याबाबतची पुढील माहिती प्रतिक्षेत आहे, असं म्हणायला हरकत नाही. 

पाहा : देवाब्राह्मणाच्या नव्हे, संविधानाच्या साक्षीने अभिनेत्याने बांधली लग्नगाठ 

सोनभद्र येथे सापडलेल्या खनिज संपदेसाठी साऱ्या देशात प्रसिद्ध असलेल्या उत्तर प्रदेशमधील सोनभद्र जिल्हा सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. सोनभद्र येथे १९८० मध्ये सोन्याची खान असल्याचं समोर आलं होतं.