आली लहर केला कहर! भाऊने डायरेक्ट कारच्या छतावर पुशअप मारले

धावत्या कारवर तरुणाला पुशअप मारताना पाहून हायवेवरुन जाणारे इकर वाहनचालक एकदम शॉक झाले. वाहनचालकांनी मोबाईल काढून यांची स्टंटबाजी कॅमेऱ्यात कैद केली. 

वनिता कांबळे | Updated: May 31, 2023, 07:13 PM IST
आली लहर केला कहर! भाऊने डायरेक्ट कारच्या छतावर पुशअप मारले title=

Viral Video : दारु डोक्यात गेली कोण काय करेल याचा काही नेम नाही. असाच एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये एक तरुण धावत्या कारच्या छतावर पुशअप मारताना दिसत आहे. हरियाणातील गुरुग्राम (Gurugram News) येथील हा व्हिडिओ असल्याचे समजते.  व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी अशी विचित्र स्टंटबाजी करणाऱ्या तरुणाला ताब्यात घेतले आहे. 

धावत्या कारवार  स्टंटबाजी करणाऱ्या तरुणावर दंडात्मक कारवाई

धावत्या कारवार  स्टंटबाजी करणाऱ्या या तरुणावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर वाहतूक पोलिसांनी या कारचा शोध घेतला. HR72F6692 क्रमांकाची ही कार आहे. या नंबरच्या आधारे वाहतूक पोलिस या स्टंटबाजापर्यंत पोहचले. पोलिसांनी या स्टंटबाजांकडून सहा हजार रुपयांचा दंड वसुल केला आहे. या व्हिडिओत एकूण चार तरुण दिसत आहे. यापैकी दोघा तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर, दोघांचा पोलिस शोध घेत आहेत. दारुच्या नशेत आरोपींनी ही स्टंटबाजी केल्याचे  वाहतूक पोलिसांनी सांगितले. 

व्हायरल व्हिडिओमध्ये नेमकं आहे तरी काय?

व्हायरल व्हिडिओमध्ये चार तरुण स्टंटबाजी करताना दिसत आहेत. एक तरुण हा भरधाव वेगाने कार चालवत आहे. एक तरुण कारच्या छतावर पुशअप मारत आहे. तर दोन तरुण हे कारच्या खिडक्यांमधून बाहेर डोकावत गोंधळ घालण्याचा प्रयत्न करत आहेत. रात्रीच्या वेळेस हायवेवर हे तरुण स्टंटबाजी आणि हुल्लडबाजी करत असल्याचे व्हिडिओत दिसत आहे. 

भर रस्त्यात तरुणांचे जीवघेणे कृत्य

भर रस्त्यात तरुण जीवघेणी स्टंटबाजी करताना दिसताना दिसत आहेत. अशा प्रकारे ते स्वत: आणि इतरांचा देखील जीव धोक्यात घालत आहेत. वाहतूक पोलिसांनी या तरुणांवर वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी कारवाई केली आहे. हायवेवरुन जाणाऱ्या इतर वाहनचालकांनी याचा व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद केला.  हा व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. 

मुंबईत बाईकवर स्टंटबाजी

मुंबईच्या वर्सोवामध्ये दुचाकीस्वार धोकादायक स्टंटबाजी करतानाचा प्रकार समोर आला होता. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. पोलिसांनी या व्हिडिओची दखल घेत या प्रकरणात गुन्हा दाखल केला होता. या व्हिडिओत स्कूटरवरील दोन युवक धोकादायक स्टंट करताना दिसत होते.