केरळमधील तरुणांसमोर हमासच्या नेत्याचं भाषण; 'बुल्डोझर हिंदुत्व उखाडण्या'ची घोषणाबाजी

Hamas Leader Virtual Address At Pro Palestine Rally In Kerala: 7 ऑक्टोबरपासून हमास आणि इस्रायलमध्ये सुरु असलेल्या संघर्षात संपूर्ण जग 2 भागांमध्ये विभागलं केल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Oct 28, 2023, 11:53 AM IST
केरळमधील तरुणांसमोर हमासच्या नेत्याचं भाषण; 'बुल्डोझर हिंदुत्व उखाडण्या'ची घोषणाबाजी title=
भाजपाने या मुद्द्यावरुन नोंदवला आक्षेप

Hamas Leader Virtual Address At Pro Palestine Rally In Kerala: केरळमधील मल्लपुरममध्ये पॅलेस्टाईन समर्थकांच्या एका सभेमध्ये हमासचा नेता खालिद मशेल हा ऑनलाइन माध्यमातून उपस्थित होता अशी माहिती समोर आली आहे. ऑनलाइन माध्यमातून खालिद मशेलने या सभेला संबोधित केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. भारतीय जनता पार्टीने या प्रकरणामध्ये कारवाईची मागणी केली आहे. हमासचा नेता खालिद मलेशने शुक्रवारी मल्लपुरममध्ये आयोजित सॉलिडेरिटी युवा आंदोलनाच्या कार्यक्रमात डिजीटल माध्यमातून हजेरी लावली.  जमात-ए-इस्लामीचा भाग असेलल्या यूथ विंगने या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं अशी माहिती 'आजतक'ने दिली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या बैठकीमध्ये, 'बुल्डोझर हिंदुत्व आणि रंगद्वेष करणारा यहूदीवाद उखडून फेका' अशा घोषणाही देण्यात आला. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष सुरेंद्रन यांनी हमासचा नेता सहभागी झाल्याच्या गोष्टीची गंभीर दखल घेतली जावी आणि कारवाई करावी अशी मागणी केली आहे.

भाजपाचा हल्लाबोल

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष सुरेंद्रन यांनी, 'केरळमधील मल्लापूरममध्ये सॉलिडेरिटी कार्यक्रमामध्ये हमासचा नेता खालिद मशेलने व्हर्चूअल माध्यमातून उपस्थित होता हे चिंताजनक आहे. (केरळचे मुख्यमंत्री) पन्नराई विजयन यांचे पोलीस कुठे आहेत? 'पॅलेस्टाईन वाचावा'च्या आडून ते दहशतवादी संघटना असेलल्या हमास आणि त्याच्या नेत्यांना युद्धे म्हणून दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. हे स्वीकारता येणार नाही,' असं म्हटलं आहे.

अनेक ठिकाणी रॅलीचं आयोजन

केरळमध्ये काँग्रेसच्या नेतृत्वाखालील युनायटेड डेमोक्रेटिक फ्रंटचे प्रमुख सहकारी असलेल्या आययूएमएलनेही गाझामध्ये झालेल्या हल्ल्यांच्या निषेधार्थ गुरुवारी उत्तर कोझिकोडमध्ये रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. 

7 ऑक्टोबरपासून सुरु आहे संघर्ष

मागील 3 आठवड्यांपासून गाझा आणि इस्रायलमध्ये संघर्ष सुरु आहे. दोन्ही बाजूंनी एकमेकांवर हवाई हल्ले केले जात आहेत. हमास या पॅसेल्टीनी दहशतवादी संघटनेनं शनिवारी 7 ऑक्टोबर रोजी इस्रायलमध्ये घुसखोरी करुन अनेक गावांमध्ये नरसंहार केल्यानंतर इस्रायल पॅलेस्टाइन युद्धाला नव्याने तोंड फुटलं आहे.

भारताने स्पष्ट केली भूमिका

हमासच्या अतिरेक्यांनी 7 ऑक्टोबर रोजी केलेला हल्ला हा 'दहशतवादी कृत्य'च असल्याचं मानतो, असं भारताने म्हटलं आहे. मात्र त्याचवेळी पॅलेस्टाईनच्या स्वातंत्र्याला भारताचा पाठिंबा कायम राहणार असल्याचं भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे. इस्रायल आणि पॅलेस्टाइन या दोघांनी शांततेमध्ये नांदावं यासाठी चर्चेच्या माध्यमातूनच यावर तोडगा शोधला पाहिजे अशी भारताचा भूमिका असल्याचं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागहची यांनी म्हटलं आहे. 7 ऑक्टोबर रोजी हमासच्या दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन भारत खंबीरपणे इस्रायलच्या पाठीशी उभा असल्याचं स्पष्ट केलं होतं.