हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांना कोरोनाची लागण

हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांना कोरोनाची लागण झाली आहे. 

Updated: Aug 24, 2020, 09:49 PM IST
हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांना कोरोनाची लागण title=

नवी दिल्ली : हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांना कोरोनाची लागण झाली आहे. सीएम खट्टर यांनी स्वतः ट्वीट करून ही माहिती दिली आहे. सीएम खट्टर यांनी गेल्या एका आठवड्यात त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्व व्यक्तींना क्वारंटाईन होण्याचे व नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन केले आहे. सीएम खट्टर यांनी गेल्या सात दिवसांत थेट संपर्कात आलेल्या सर्व लोकांनाची ही चौकशी केली आहे.

मुख्यमंत्री खट्टर यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, आज कोरोना टेस्ट झाली होती, ज्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. आपल्या कर्मचार्‍यांना कोरोना टेस्ट करण्यास सांगितले आहे.'

महत्त्वाचे म्हणजे केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंग शेखावत कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आल्यानंतर खट्टर यांनी स्वत:ला क्वारंटाई केले होते. एसवायएलच्या बैठकीत खट्टर यांनी शेखावत यांची भेट घेतली होती. 20 ऑगस्ट रोजी गजेंद्रसिंग शेखावत यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. कुरुक्षेत्रचे खासदार नायबसिंग सैनी यांनीही मुख्यमंत्री खट्टर यांची भेट घेतली होती. त्यामुळे सैनी देखील कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.

मनोहर लाल खट्टर हे कोरोनाची लागण झालेले पहिले मुख्यमंत्री नाहीत. त्यांच्या अगोदर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा यांनाही कोरोनाची लागण झाली आहे.

देशात कोरोना संक्रमितांची संख्या सतत वाढत आहे. आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत कोरोनामुळे 61408 नवे रुग्ण वाढले आहेत. तर 836 लोकांचा मृत्यू झाला आहे. देशात कोरोना संक्रमितांची संख्या 31 लाखांच्या पुढे गेली आहे. संसर्गामुळे आतापर्यंत देशात 57 हजाराहून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 23 लाख लोकांनी कोरोनावर मात केली आहे.