वऱ्हाडाची कार खांबावर आदळली, ड्रायव्हरला डुलकी लागल्याने सासरी जाणारी नवरी रुग्णालयात

Grooms Car Crashes:  वऱ्हाड घेऊन चाललेल्या चालकाचा डोळा लागला. इतक्यातच कारसमोर सायकलस्वार आला आणि चालकाचे नियंत्रण सुटले.

Pravin Dabholkar | Updated: Dec 5, 2023, 08:14 AM IST
वऱ्हाडाची कार खांबावर आदळली, ड्रायव्हरला डुलकी लागल्याने सासरी जाणारी नवरी रुग्णालयात title=

Grooms Car Crashes: नवरी लग्न होऊन सासरी निघाली होती पण ड्रायव्हरच्या एका चुकीमुळे तिला रुग्णालयात दाखल व्हावे लागले. सादाबाद कोतवाली क्षेत्रात येणाऱ्या हाथरस रोडवर एक भीषण अपघात झालाय. येथे झालेल्या अपघातात नवरीसहिती 3 जण गंभीर जखमी झाले. जखमींना स्थानिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. येथून जखमी नवरी आणि तिच्या नणंदेला आग्रा येथे पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले. यानंतर वरात हाथरसहून फरुखाबाद परतत होती.

फरुखाबादच्या अराफदमूर येथे राहणाऱ्या शिवमचे लग्न हाथरसच्या तनुजसोबत झाला. नवरी तनुजची सोमवारी वरात निघणार होती. तनुज आपला पती शिवम आणि नातेवाईकांसोबत एका कारमधून रवाना झाली.कार चंदपा ठाणे क्षेत्रातील कछपुरा गावाजवळ पोहोचली. तेव्हाच चालकाचा डोळा लागला. इतक्यातच कारसमोर सायकलस्वार आला आणि चालकाचे नियंत्रण सुटले.

यानंतर कार रस्त्याबाजुला असलेल्या विजेच्या खांब्यावर आदळली. सायकल चालक सूरज हा कछपूराच्या रस्त्यावर जखमी होऊन पडला. कार आदळल्याने लोक घाबरले आणि किंचाळ्यांचा आवाज येऊ लागला. नवरी तनुज आणि तिची नणंद नम्रता जखमी झाली. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. 

माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यानंतर जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. तनुजच्या चेहऱ्यावर जखमा झाल्या होत्या. नम्रताच्या डोक्यालादेखील मार लागला होता.  गंभीर जखमी असलेल्या दोघींना प्राथमिक उपचारासाठी आगरा येथे पाठवण्यात आले. यासंदर्भात कोणती तक्रार आली नसल्याचे पोलीस अधिकारी मुकेश कुमार यांनी सांगितले.

कारमधून उडवल्या नोटा, पोलिसांनी Video पाहिला अन्...

उत्तर प्रदेशमधील नोएडा येथील स्टंटबाजीचा व्हिडीओ एक्सवर (ट्वीटरवर) काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये गाड्यांचा एक ताफा नोएडामधील सेक्टर 37 वरुन सिटी सेंटरला जाताना दिसत होता. भरधाव वेगात जाणाऱ्या या गाड्यांच्या सनरुफबरोबरच खिडकीमधून बाहेर डोकावत गाडीमधील प्रवासी नोटा दाखवत होते. या ताफ्यात एकूण 5 कार होत्या. ज्यामध्ये एसयूव्ही, हॅचबॅक कार्सचा समावेश होता. या कारमधून नेमक्या कशासाठी नोटा दाखवल्या जात होत्या हे स्पष्ट झालं नाही. मात्र एका कारमधील व्यक्तींनी 20 रुपयांच्या अनेक नोटा धावत्या कारमधून रस्त्यावर फेकल्याचं दिसून आलं. नोएडा वाहतूक पोलिसांनी त्यांच्या एक्स अकाऊंटवरुन प्रचंड वेगाने कार चालवत स्टंटबाजी करणाऱ्यांना दंड ठोठावल्याचे फोटो शेअर केले आहेत. या सर्वांचे 12 ई-चालान कापण्यात आलेत. या एका प्रकरणामध्ये आधीचा आणि नवा दंड असे एकूण 3.96 लाखांचा दंड पोलिसांनी या 5 गाड्यांच्या मालकांना ठोठावला आहे. मात्र त्यांना हा दंड नेमक्या कोणकोणत्या कारणांसाठी सुनावण्यात आला हे स्पष्ट करण्यात आलेलं नाही.  बेदरकारपणे कार चालवत स्वत:बरोबर या लोकांनी इथरांचागही जीव धोक्यात टाकला. उत्तर भारतामध्ये सध्या लग्नांचा कालावधी असल्याने हा ताफा एखाद्या लग्नाच्या वऱ्हाडातील असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. लग्नसोहळ्याला जाताना दौलतजादा करण्याच्या नादात त्यांनी ही स्टंटबाजी केल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.