HDFC बँकेच्या ग्राहकांची मज्जाच मज्जा! आजपासून व्याजदरातील बदल होणार लागू

खासगी क्षेत्रातील आघाडीची बँक HDFC च्या ग्राहकांसाठी महत्वाची बातमी आहे. बँकेने मुदत ठेवीच्या (FD Rate)व्याज दरात पुन्हा बदल केला आहे. 

Updated: Apr 20, 2022, 12:40 PM IST
HDFC बँकेच्या ग्राहकांची मज्जाच मज्जा! आजपासून व्याजदरातील बदल  होणार लागू title=

मुंबई : खासगी क्षेत्रातील आघाडीची बँक HDFC च्या ग्राहकांसाठी महत्वाची बातमी आहे. बँकेने मुदत ठेवीच्या (FD Rate)व्याज दरात पुन्हा बदल केला आहे. नवे दर आजपासून म्हणजेच 20 एप्रिलपासून लागू करण्यात आले आहेत. नवीन व्याजदर 2 कोटी रुपयांपेक्षा कमी FD वर लागू असतील.

हे आहेत नवीन व्याजदर

बँकेच्या वतीने सर्वसामान्य ग्राहकांना 7 ते 29 दिवसांच्या एफडीवर 2.50 टक्के व्याज दिले जात आहे. याशिवाय बँक 30 दिवस ते 90 दिवसांच्या एफडीवर 3% व्याज देत आहे. नवीन बदलानंतर, HDFC बँक 91 दिवस ते 6 महिन्यांच्या मुदत ठेवींवर 3.50% व्याज देत आहे.

कमाल व्याज दर 5.60 टक्के

बँकेच्या वेबसाइटनुसार, एका दिवसापासून ते दोन वर्षांच्या कालावधीत म्यॅच्युअर होणाऱ्या एफडीवर 5.10 टक्के दराने व्याज दिले जाईल. दोन वर्षे 1 दिवस तीन वर्षांच्या FD वर 5.20 टक्के व्याजदर आहे. त्याच वेळी, तीन वर्षे 1 दिवस ते पाच वर्षांच्या FD वर 5.45 टक्के व्याजदर आणि पाच वर्षे 1 दिवस ते 10 वर्षांच्या FD वर 5.60 टक्के व्याजदर मिळेल.

FD व्याज दर 20 एप्रिल 2022 पासून लागू 

  • 7 ते 14 दिवस: 2.50%
  • 15 ते 29 दिवस : 2.50%
  • 30 ते 45 दिवस: 3%
  • 61 ते 90 दिवस: 3%
  • 91 दिवस ते 6 महिने: 3.5%
  • 6 महिने 1 दिवस ते 9 महिने: 4.4%
  • 9 महिने 1 दिवस ते 1 वर्ष : 4.40%
  • 1 वर्ष 1 दिवस ते 2 वर्षे : 5.10%
  • 2 वर्षे 1 दिवस ते 3 वर्षे : 5.20%
  • 3 वर्षे ते 1 दिवस 5 वर्षे : 5.45%
  • 5 वर्षे 1 दिवस ते 10 वर्षे : 5.60%